मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी हत्तीने केलं असं काही की पाहूनच वाटेल कौतुक

VIDEO: पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी हत्तीने केलं असं काही की पाहूनच वाटेल कौतुक

हत्तीच्या पिल्लाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video of Elephant) होत आहे. यात हा हत्ती पाण्यात बुडू लागलेल्या व्यक्तीचा जीव वाचवताना दिसतो

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 23 डिसेंबर : हत्ती अतिशय विशाल प्राणी असतो मात्र तो तितकाच समजदारही असतो. त्यांना चांगली वागणूक दिल्यास ते माणसांसोबत अगदी मित्राप्रमाणेच वागतात. हत्ती आणि माणसाची अतिशय घट्ट मैत्री दाखवणारे अनेक व्हिडिओ आजवर तुम्ही पाहिले असतील. सध्या हत्तीच्या पिल्लाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video of Elephant) होत आहे. यात हा हत्ती पाण्यात बुडू लागलेल्या व्यक्तीचा जीव वाचवताना दिसतो (Elephant Trying to Save Life of a Man).

डोक्यावर विग अन् कानात हेडफोन घालून देत होता पोलीस भरती परीक्षा; VIDEO

खरंतर हा व्यक्ती पाण्यात बुडत नसतो. मात्र किनाऱ्यावर असलेल्या हत्तीच्या पिल्लाला असं वाटतं की हा व्यक्ती पाण्याच बुडत आहे. यानंतर हत्तीच्या पिल्लाने क्षणाचाही विलंब न करता पाण्यात चालायला सुरुवात केली. हा व्यक्ती बुडू नये यासाठी हत्ती अगदी वेगात त्याच्या दिशेने जाऊ लागला. पुढे या व्यक्तीजवळ जात हत्ती त्याला उचलून घेण्याचा आणि किनाऱ्यावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व पाहून पाण्यातील व्यक्ती हसू लागतो.

हत्तीची ही माणुसकी पाहण्यासारखी आहे. सहसा एखादा व्यक्ती पाण्यात बुडत असेल तर आसपासचे लोक त्याच्या मदतीसाठी येतात आणि त्याला वाचवून माणुसकीचं दर्शन घडवतात. मात्र या घटनेत एका हत्तीच्या पिल्लाने माणुसकीचं दर्शन घडवलं. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

डीजेवर डान्स करत होते आजोबा; इतक्यात काठी घेऊन आल्या आजीबाई अन्..., मजेशीर VIDEO

मनाला स्पर्शून जाणारा हा व्हिडिओ ट्विटरवर @DannyDeraney नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 22 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर 1,500 हून अधिकांनी लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, अद्भुत सहानुभूती. तर आणखी एका यूजरने लिहिलं, हत्ती खरंच जादुई असतात. मला लहान असतानापासूनच हत्ती फार आवडतात.

First published:

Tags: Elephant, Video viral