VIDEO शूट करण्यात मग्न होती तरुणी; मागून आलेल्या हत्तीनं केलेलं कृत्य पाहून पुरती घाबरली
VIDEO शूट करण्यात मग्न होती तरुणी; मागून आलेल्या हत्तीनं केलेलं कृत्य पाहून पुरती घाबरली
इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी हत्तीच्या समोर उभा राहून व्हिडिओ शूट करण्याच्या तयारीत आहे, पण अचानक मागून हत्ती आपल्या सोंडेनं या मुलीला स्पर्श करू लागतो
नवी दिल्ली 24 एप्रिल : हत्तींचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये राहतात. यात कधी हत्ती नाचताना दिसतात तर कधी आपसात फाईट करताना दिसतात. मात्र, अनेकवेळा हत्तींच्या कारनाम्यांचे व्हिडिओही व्हायरल होतात, हे पाहून अगदी सगळ्यांनाच हसू येतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक हत्ती एका मुलीसोबत असं काही करताना दिसतो, ज्याची तिने कल्पनाही केलेली नसते (Viral Video of Elephant).
लग्नाच्या स्टेजवर नवरीने नवऱ्याला केलं सुन्न; Wedding Video होतोय व्हायरल
इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी हत्तीच्या समोर उभा राहून व्हिडिओ शूट करण्याच्या तयारीत आहे, पण अचानक मागून हत्ती आपल्या सोंडेनं या मुलीला स्पर्श करू लागतो. हत्ती मुलीला आपल्या सोंडेने पकडतो, ज्यामुळे ही तरुणी वैतागते.
हत्तीच्या सोंडेतून सुटण्यासाठी ती बरेच प्रयत्न करते आणि अखेर हत्ती आपली सोंड मागे घेतो. हत्तीच्या या कृत्यानंतर तरुणीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहाण्यासारखे होते. सोशल मीडियावर या व्हिडिओला भरपूर पसंती मिळत आहे.
तरुणाने उंच इमारतीवरुन उडी घेत ब्लॅकफ्लिप मारली पण...; खतरनाक स्टंट VIDEO
हत्तीचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर animologyy नावाच्या पेजवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला आहे. तर अडीच हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. अनेक जण हा व्हिडिओ शेअरही करत आहेत. विशेषत: प्राणीप्रेमींची या व्हिडिओला विशेष पसंती मिळत आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.