हत्तीचा अजब जुगाड! चलाखीनं ओलांडला रेल्वे ट्रॅक, VIDEO VIRAL

हत्तीचा अजब जुगाड! चलाखीनं ओलांडला रेल्वे ट्रॅक, VIDEO VIRAL

माणसांना लाजवेल अशी कल्पना हत्तीला सुचली, पाहा हा VIRAL VIDEO.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : एकेकाळी मांजरींचे व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल होत, मात्र आजकाल हत्तीचे व्हिडीओ ट्रेंडमध्ये आले आहेत. इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना जास्त बुद्धी असते. त्यामुळे हत्तींना शिकवून त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामे करवून घेता येतात. आता मात्र हे हत्ती स्वत:ची कामही खुप चलाखीनं करू लागले आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हत्ती माणसाला लाजवेल अशा पध्दतीनं रेल्वे ट्रॅक ओलांडत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हत्ती रेल्वे रुळ ओलांडताना दिसत आहे. आयएफएस सुशांत नंदा यांनी हत्तीचा हा शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हत्ती रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग गेटसमोर उभा आहे. ट्रॅक ओलांडण्यासाठी हत्ती सोंडेने हळू हळू गेट उचलतो आणि त्याच्या खाली जातो. त्यावेळी कोणतेही ट्रेन येत नसल्याचे पाहून हत्तीनं आरामात ट्रॅक ओलांडला.

हा व्हिडिओ शेअर करताना नंदा यांनी, "ट्रेनची लाइन या हत्ती थांबू शकली नाही. हत्तीला आपला मार्ग योग्यप्रकारे माहित आहे. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीपर्यंत हे पुढे जात असते. वेगवेगळे हत्ती विविध कल्पना वापरतात", असे कॅप्शन लिहिले आहे. हा व्हिडीओ 8 डिसेंबरला ट्विटरवर शेअर करण्यात आला. आतापर्यंत 43 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर, 2 हजार 500 लोकांनी याला पसंत केले आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही युझरनं चिंताही व्यक्त केली आहे. काही युझरनी ट्रेन येणार नव्हती म्हणून हत्तीला काही झाले नाही, अन्यथा मोठा अपघात झाला असता, अशी चिंता व्यक्त केली आहे.

First published: December 10, 2019, 6:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading