मुंबई, 27 नोव्हेंबर : वार्तांकन करताना एखादा अपघात किंवा विचित्र गोष्ट घडली आणि ती लाईव्ह गेली तर काय होईल? काही दिवसांपूर्वी एका चॅनलवर लाईव्ह सुरू असताना पाण्याचे फवारे वार्तांकन करणाऱ्या तरुणीच्या अंगावर उडाल्यानं ती ओरडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एक गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हत्तीचे साधारण गमतीदार किंवा चिरडलेल्या रुपातले अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण लाईव्ह शो दरम्यान त्याने केलेला कारनामा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
एक पत्रकार हत्तीला आणलेल्या ठिकाणहून वार्तांकन करत असताना अचानक हत्तीला मस्ती सुचली आणि त्यानं सोंडेनं जोरात वर लावलेल्या पताक्यांवर हवा सोडली. दोन सेकंदासाठी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारालाही काही सुचेना तो ओरडत बाजूला झाला. हा घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इस्लामाबादच्या प्राणीसंग्रहालयात एक हत्तीला तब्येत बिघडल्यानं आणल्यात आलं. त्याच्यावर आठवडाभर उपचार घेतले जाणार असून त्यानंतर त्याला दुसरीकडे पाठवून दिलं जाणार असं वार्तांकन पत्रकार करत असतानाच हत्ती त्याच्या अंगावर सोंडेनं पाणी उडवतो. पत्रकाराच्या अंगावर पाण्याचे फवारे उडतात आणि तो घाबरून पळ काढतो.
35 हजारहून अधिक लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला असून 33 हून अधिक जणांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. हत्तीची ही मस्ती सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून युझर्सनी देखील खूप लाईक्स दिले आहेत. अनेकांनी भन्नाट कमेंट्स देखील केल्या आहेत.