खरा रसिक! पियानोच्या धून ऐकण्यासाठी जंगलातून आला हत्ती, VIDEO VIRAL

खरा रसिक! पियानोच्या धून ऐकण्यासाठी जंगलातून आला हत्ती, VIDEO VIRAL

हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 07 जून : केरळमध्ये गर्भवती हत्तीणीच्या झालेल्या निर्घृण हत्येनंतर सोशल मीडियावर हत्तींचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कुठे हत्ती माणसाचा जीव वाचवताना तर कुठे खेळताना तर कुठे दोन हत्तींमधील लढाईचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हत्ती हा बुद्धीमान प्राणी असं म्हटलं जातं. हत्तीचे सुपासारखे असलेले कान जंगलातील घडणाऱ्या गोष्टींचा वेध घेत असतात. संगीताचा आवाज ऐकून चक्क एक हत्ती जंगलातून येताना दिसत आहे. हा संगीत प्रेमी हत्ती पियानोच्या धूनवर आपलं डोक हलवत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यात आलं असून हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हत्ती अंधळा असू शकतो पण संगीतासाठी त्याचं हृदय नाही. या संगीताचा आवाज ऐकून तो स्वत:ला रोखू शकला नाही. पियानो वाजवणाऱ्या व्यक्तीजवळ येऊन ते शांतपणे ऐकत आपल्या कानात आणि हृदयात साठवत राहिला असं दृश्य या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ 3,500 हून अधिक लोकांनी पाहिला आहे. 400 हून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

हे वाचा-VIDEO : हत्तीच्या पिल्लानं दाखवली माणूसकी, बुडणाऱ्या तरुणाचा वाचवला जीव

हे वाचा-माकडाची शिकर करण्यासाठी झाडावर चढला बिबट्या, पुढे काय झालं पाहा VIDEO

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 8, 2020, 11:35 AM IST

ताज्या बातम्या