लपून-छपून उसाच्या शेतावर हत्तीचं पिल्लू मारत होतं ताव, व्यक्तीनं पाहिलं आणि...

लपून-छपून उसाच्या शेतावर हत्तीचं पिल्लू मारत होतं ताव, व्यक्तीनं पाहिलं आणि...

उसावर ताव मारण्याच्या नादात आपण पकडले गेलो हे हत्तीच्या पिल्लाला कळताच त्यानं जे केलं ते पाहून आवरणार नाही हसू.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : हत्तीच्या पिल्लाचे मजा मस्ती करताना तर कधी खट्याळपणे हसवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अशा प्रकारचा आणखीन एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आपण पाहिलं तर हत्तीचं पिल्लू शेतातील उसावर ताव मारत आहे. तेवढ्यात मागून एक व्यक्ती त्याच्या अंगावर प्रकाश पाडतो. आपण पकडले गेलो या भीतीनं हत्ती लपण्यासाठी जागा शोधतो.

हत्तीच्या पिल्लाला काहीच सुचत नाही अखेर तो एका खांबाच्या आड लपायला जातो. आपण या खांबामागे लपले जाऊ असा भाबडा विश्वास या पिल्लाला असतो. या हत्तीच्या पिल्लाचे गमतीशीर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उसाच्या शेतावर ताव मारत असताना आपण पकडले गेलो आणि लपण्यासाठी खांबाचा आधार घेतल्यानं सोशल मीडियावर या फोटोवर युझर्सनी भन्नाट कमेंट्स देखील केल्या आहेत.

#ไม่เห็นเลยจริงๆ #หลบเป้ปเจ้าหน้าที่มา

​ นิ่งๆเดี๋ยวเจ้าหน้าที่เห็น

​ไปแล้วค่อยกินอ้อยต่อ

Posted by วีรวัฒน์ พรหมเมือง on Sunday, 15 November 2020

हे वाचा- प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या महिलेला दिला धक्का, समोरून आली मेट्रो आणि...

बोरिंग पांडा यांच्या मते थायलंडमध्ये चियांग माई या परिसरातील हा फोटो असल्याचं सांगितलं जात आहे. अधिकारी पाहातील आपलं भोजन चालू राहूदे असं म्हणत कॅप्शन देखील दिलं आहे. रेडिट आणि ट्वीटरवर तर भन्नाट कमेंट्स करण्यात आल्या आहेत. हत्तीला उस आणि केळी भयंकर आवडतात असंही काही युझर्सनी सांगितलं आहे. याआधी एका हत्तीचा उस चोरी करून खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

तर दुसरीकडे हत्तीनं केळी खाण्यासाठी एका बसवर देखील हल्ला केला होता. बसला अडवून त्यावर केळी खाण्यासाठी हल्ला केल्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 21, 2020, 2:34 PM IST

ताज्या बातम्या