केळी खाण्याचा मोह हत्तीलाही आवरला नाही, काय केलं पाहा VIDEO

केळी खाण्याचा मोह हत्तीलाही आवरला नाही, काय केलं पाहा VIDEO

फेरफटका मारणाऱ्या हत्तीनं पर्यटकांच्या हातून हिसकावली फळं, पुढे काय झालं पाहा VIDEO

  • Share this:

मुंबई, 29 सप्टेंबर : नुकताच हत्तीच्या पिल्लाचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये हत्तीचं पिल्लू पाण्याच्या टपात बसून खेळत होतं या व्हिडीओला लोकांनी खूप लाईक केलं त्यानंतर आता एक मस्तीखोर हत्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. रस्त्यावरून डुलत फेरफटका मारत असताना अचानक त्याला समोर फळ दिलं आणि खाण्याचा मोह आवरला नाही.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता दोन तरुण केळी सोलून खाण्यासाठी तयार होते मात्र समोरून येणारा हत्ती त्यांच्या हातातील सोलेलं हे केळ हिसकावून गट्टम करतो पुढे जातो आणि दुसऱ्या व्यक्तीच्या हातातील केळही स्वत:च खाऊन टाकतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आपल्याच धुंदीत असणाऱ्या हत्तीला केळी पाहून मात्र मोठा आनंद झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा हत्ती केळी खाण्यासाठी इतका भुकेलेला आहे की त्यानं केळ्याचं सालंही सोडलं नाही आणि खाली पडलेला केळ्याचा तुकडाही वाया जाऊ न देता उचलून खाऊन निघून गेला हे दोन तरुण मात्र त्याच्याकडे पाहात राहिले. दुसऱ्या तरुणानं केळं अर्ध तोंडात घातलं तर त्याच्या तोंडातलं केळ खेचून हत्तीनं खाल्लं आणि निघून गेला.

हे वाचा-बम-बम भोले म्हणत त्यानं पूलावरून नदीत मारली उडी आणि..., थरारक VIDEO

हे वाचा-म्हशींनी सिंहाला असा दाखवला इंगा की थेट पळतच सुटला, पाहा VIDEO

हा व्हिडीओ आतापर्यंत 9 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 160 हून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे दीड हजारहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. हत्तीच्या

Published by: Kranti Kanetkar
First published: September 29, 2020, 7:53 AM IST
Tags:

ताज्या बातम्या