मुंबई, 28 डिसेंबर : भुकेनं व्याकूळ झालेल्या कुत्र्याला खायला दिल्यानंतर त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आणखीन एका प्राण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भुकेनं हैराण झाला पण खायला मिळत नाही त्यामुळे संतापाच्या भरात हत्तीनं जे केलं ते पाहून काळजात धडकी भरणारं आहे. 38 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता हत्ती झाडाची पानं खाण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. मात्र हत्तीला त्या झाडाची पानं खाता येत नाही त्यामुळे रागाच्या भरात झाडंच उखडलं आहे.
हा व्हिडिओ प्रथम IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला होता, त्यानंतर तो व्हायरल झाला. या 38-सेकंदाच्या व्हिडीओमध्ये हत्तीने इतकी शक्ती लावली संपूर्ण झाड जमीनदोस्त झाले. पण त्याचवेळी, हत्तींनी झाडाला का उपटून ते का खाली पाडले.हत्तीचा राग पाहून युझर्सच्या काळजात धस्स झालं. आतापर्यंत हा व्हिडीओ 6.8 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी यावर भन्नाट कमेंट्स देखील केल्या आहेत.