मराठी बातम्या /बातम्या /Viral /

केळी खाण्यासाठी हत्तीनं अडवली बस, पुढे काय झालं पाहा VIDEO

केळी खाण्यासाठी हत्तीनं अडवली बस, पुढे काय झालं पाहा VIDEO

 हत्तीची ही दादागिरी आणि चोरी कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हत्तीची ही दादागिरी आणि चोरी कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हत्तीची ही दादागिरी आणि चोरी कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : सोशल मीडियावर हत्तींचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. कधी खेळताना तर कधी मस्ती करताना कधी पूल ओलांडताना तर कधी नासधूस करताना. पण सध्या हत्तीचा एक व्हिडीओ चक्क चोरी करताना व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता हत्तीनं जबरदस्तीनं बसचा रस्ता अडवला आहे आणि बसमध्ये बस चालकावर हल्ला करून त्याच्या केबिनमधील केळी पळवली आहेत. ही केळी खाण्यासाठी हत्ती आक्रमक झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ड्रायव्हरच्या अंगावरून सोंड पलिकडे फिरवत या हत्तीनं केळ्यांच्या घडाची चोरी केली आहे.

हे वाचा- डॉक्टर की हैवान? महिलांना घाबरवून करायचा ऑपरेशन, ठोठावला 465 वर्षांचा तुरुंगवास

एका युझरनं हा व्हिडीओ मुद्दाम तयार करण्यात आल्याचं म्हटलं आहे तर दुसरा युझर म्हणतो हत्तींना खायला मिळत नाही म्हणून ते असं वागतात. तर अनेक युझर्सनी केळी चोरणारा श्रीलंकेचा हत्ती असं म्हटलं आहे. IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ आतापर्यंत 444.1 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 50 हून अधिक लोकांनी शेअर केला आहे. हत्तीची ही दादागिरी आणि चोरी कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

First published: