काय सांगता? इथे हत्तीला द्यावा लागतो टॅक्स...नेमका काय आहे प्रकार पाहा VIDEO

काय सांगता? इथे हत्तीला द्यावा लागतो टॅक्स...नेमका काय आहे प्रकार पाहा VIDEO

गाडीतील व्यक्ती जोपर्यंत त्याला खायला केळी किंवा खाद्यपदार्थ देत नाही तोपर्यंत हा हत्ती गाडी पुढे सोडत नाही.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपूर्वी नागानं रस्त्यावर ठाण मांडून वाहतुकीचा खोळंबा केल्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. पण सापच नाही तर इतर प्राणीजन्यही माणसांप्रमाणे वाहतुकीचा खोळंबा करू शकतात याचं उदाहरण देणारा आणखीन एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की हत्ती रस्त्यावरून जाणारी प्रत्येक गाडी थांबवत आहे. या गाडीतील व्यक्ती जोपर्यंत त्याला खायला केळी किंवा खाद्यपदार्थ देत नाही तोपर्यंत हा हत्ती गाडी पुढे सोडत नाही. हैराण करणारी गोष्ट म्हणजे या हत्तीला बरोबर समजतं. तो प्रत्येक गाडी थांबवून त्यांच्याकडून खायला घेतो आणि तिथून जाणारे प्रवासीही त्याला टॅक्सच्या रुपात केळी किंवा खाद्यपदार्थ दिल्याशिवाय पुढे जात नाहीत.

हे वाचा-क्या बात है! ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र

तिथल्या काही लोकांनी ही घटना आपल्या कमेऱ्यात कैद केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हत्ती रस्त्यावर उभा असल्याचे दिसत आहे. रस्त्यावरुन येणारी आणि जाणारी वाहने या हत्तीला खायला देत आहेत. त्याला खायला केळी किंवा अन्नपदार्थ दिले नाहीत तर तो गाडी अडवून ठेवतो. या व्हिडीओमधील आणखीन एक गमतीशीर भाग म्हणजे हा हत्ती काही खाद्यपदार्थ खातो आणि काही आपल्याला नंतर खाण्यासाठी म्हणून जमिनीवर साठवून ठेवत आहे.

हे वाचा-OMG! खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

बऱ्याचदा या हत्तींना जंगलात खाद्यपदार्थ मिळाले नाहीत की ते गावाच्या दिशेनं येताता आणि शेतातची नासधूस करतात मात्र इथल्या नागरिकांनी हत्तीला खायला दिल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ अतिशय लोकप्रिय झाला असून सध्या या खाद्यपदार्थांच्या रुपानं टॅक्स घेणाऱ्या हत्तीची चांगलीच चर्चा होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 19, 2020, 9:23 PM IST

ताज्या बातम्या