Home /News /viral /

VIDEO: 50 प्रवाशांनी भरलेल्या बसवर हल्ला करायला आला हत्ती, पाहा चालकाने काय केलं

VIDEO: 50 प्रवाशांनी भरलेल्या बसवर हल्ला करायला आला हत्ती, पाहा चालकाने काय केलं

एका जंगली हत्तीने बुधवारी संध्याकाळी KSRTC बसवर हल्ला (Elephant Attack on Bus) केल्यानंतर दहशत निर्माण झाली. या हत्तीला स्थानिक रहिवासी 'पदयप्पा' म्हणतात

  नवी दिल्ली 07 एप्रिल : जंगलातील बलाढ्य प्राण्यांपैकी एक असलेला हत्ती हा आपल्या शांत आणि संयमीपणामुळे ओळखला जातो. मात्र, अनेकदा हत्ती चवताळल्यानंतर आपल्यासमोर येणारी प्रत्येक गोष्ट उद्धवस्त करून टाकतो. त्यामुळे जंगलातील बहुतेक प्राणी त्याच्यापासून दूर राहाण्यातच आपलं भलं समजतात. केरळच्या मुन्नारमध्ये एका जंगली हत्तीने बुधवारी संध्याकाळी KSRTC बसवर हल्ला (Elephant Attack on Bus) केल्यानंतर दहशत निर्माण झाली. या हत्तीला स्थानिक रहिवासी 'पदयप्पा' म्हणतात. वृत्तानुसार, मुन्नारहून उदुमलपेठला जात असलेल्या बसमध्ये ५० प्रवासी होते. याच बसवर हत्तीने हल्ला केला.

  मंदिरात चोरी करण्यासाठी गेलेल्या चोराला मिळालं कर्माचं फळ; शेवटी पोलिसांना बोलावून वाचवावा लागला जीव, VIDEO

  ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेचा व्हिडिओ (Shocking Video Viral) आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी शांत राहाण्यासाठी आणि अगदी संयमाने ही स्थिती हाताळल्याबद्दल बस चालकाचं कौतुक केलं आहे. सुप्रिया साहू यांनीही चालकाला मिस्टर कूल म्हटलं आहे.
  सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर लिहिलं, या सरकारी बसचा चालक कोण आहे माहिती नाही. मात्र निश्चितपणे तो मिस्टर कूल आहे. ज्याप्रकारे त्यांनी मिस्टर एलिफंटला हाताळलं, ते पाहून असं वाटलं की ते या हत्तीला आधीपासूनच ओळखतात. हा व्हिडिओ सध्या ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे.

  फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेले अन् तिथेच जुंपली; नवरी-नवरदेवासमोरच तुफान हाणामारी, VIDEO VIRAL

  रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं गेलं आहे, की एका आठवड्याच्या आत इथे घडलेली ही दुसरी घटना आहे. ज्यात एका हत्तीने रस्त्यावरील वाहनावर हल्ला केला. या घटनेच्याआधी पदायप्पाने एका ट्रॅक्टरला धडक दिली होती. यानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Elephant, Shocking video viral

  पुढील बातम्या