मुंबई, 28 नोव्हेंबर : हत्ती आपल्याचं धुंदीत असणारा प्राणी. या हत्तीचे अनेक मस्ती करताना किंवा चिडलेला असताना नासधूस करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांत तर हत्तीने केळी, ऊस चोरी केल्याचे व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा हत्तीचा व्हिडीओ तुफान चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे एका श्वानानं हत्तीला त्रास दिला आणि त्याला धडा शिकवण्यासाठी हत्तीनं जे काही केलं ते पाहून तर तुम्ही हैराण व्हाल.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता हत्तीचं पिल्लू आपल्याच धुंदीत असताना श्वान या हत्तीच्या पिल्लाला त्रास देण्यासाठी येतो. या हत्तीवर गुरगुरतो आणि भुंकतो देखील. हत्ती सुरुवातीला त्याच्याकडे कानाडोळा करतो मात्र श्वान काही त्याची पाठ सोडत नाही. हत्ती एक-दोनवेळा पाहून घेतो आणि तिसऱ्यावेळी मात्र त्याला इंगा दाखवतो.
Friends come in all size and shapes... pic.twitter.com/PaDOQzG6c4
— Susanta Nanda (@susantananda3) November 26, 2020
Hahaha cute
— Lalithaa (@Lalitha20840021) November 26, 2020
हे वाचा-बाप रे! चक्क इवल्याशा बेडकानं गिळला भलामोठा साप, विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO
चिडलेल्या हत्तीला पाहून श्वान थेट धूम ठोकतो पण त्याची पाठ सोडेल तर तो हत्ती कसला. दिलेल्या त्रासाचा बदला घेण्यासाठी हत्ती देखील या श्वानाचा पाठलाग करतो असा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. मैत्रीला कशाचं बंधन नाही अशा कॅप्शननं हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. 13 हजारहून अधिक लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला आहे. सोशल मीडियावर देखील या व्हिडीओला भन्नाट कमेंट्स मिळत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Video viral