मराठी बातम्या /बातम्या /Viral /8 इंचाच्या अजगराला घरी घेऊन आली व्यक्ती; पाहता पाहता झाला 18 फूट VIDEO VIRAL

8 इंचाच्या अजगराला घरी घेऊन आली व्यक्ती; पाहता पाहता झाला 18 फूट VIDEO VIRAL

(फोटो सौजन्य - The Sun)

(फोटो सौजन्य - The Sun)

या अजगरासोबत कुटुंबातील सदस्य सुरक्षित आहेत. परंतु याला राग आल्यास, ती मोठी समस्या ठरू शकतं. हा अजगर काही मिनिटांतच एखाद्याच्या शरीराला लपेटून त्याचा जीव घेण्यास सक्षम आहे.

लंडन, 7 डिसेंबर : घरात जगातील सर्वात मोठा अजगर (Python) राहत असल्याची कल्पनाही करता येत नाही. पण ब्रिटनमधील (UK) ग्लोस्टरशायरमध्ये (Gloucestershire) एक असं घर आहे, जिथे जगातील सर्वात मोठा अजगर चक्क माणसांमध्ये राहतो. हा अजगर मार्कस हॉब्स यांच्या थ्री बेडरूम फ्लॅटमध्ये आरामात राहतो. मार्कस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अजगराची लांबी 18 फूट तर वजन 108 किलो आहे.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, हा एक फिमेल अजगर आहे, जो बर्मीज प्रजातीचा आहे. ज्यावेळी मार्कस या अजगराला घरी घेऊन आले होते, त्यावेळी त्याची लांबी केवळ 8 इंच इतकी होती, आता तो तब्बल 18 फूटांचा झाला आहे. याला ससे, हरिण, शेळ्या आणि डुक्कर खाणं आवडतं. मार्कस यांना हा अजगर अगदी लहान पिल्लू असताना सापडला होता, त्यानंतर त्यांनी पुढे त्याला पाळलं. पण त्यांना याचा जराही अंदाज नव्हता की, हा अजगर मोठा होऊन जगातील सर्वात मोठा बर्मीज अजगर बनेल.

(वाचा - भयंकर! वाघांचा लोकांवर हल्ला, एका उडीत तरुणावर घातली झडप, पाहा थरारक VIDEO)

या अजगराला पाळण्यासाठी त्यांना दर महिन्याला हजोरो पाउंड खर्च करावे लागतात. आता तो घरातील एका सदस्याप्रमाणे झाला असल्याचं मार्कस यांनी सांगितलं.

(वाचा - Viral: अजगर, कोब्रासारख्या विषारी सापांचा सांभाळ करणारे भिक्कू)

मार्कस यांनी सांगितलं की, या अजगरासोबत कुटुंबातील सदस्य सुरक्षित आहेत. परंतु याला राग आल्यास, ती मोठी समस्या ठरू शकतं. हा अजगर काही मिनिटांतच एखाद्याच्या शरीराला लपेटून त्याचा जीव घेण्यास सक्षम आहे. याला घराबाहेर अगदी कमी वेळा नेलं जातं. जर बाहेर काढलंच तर त्याला कुंपणाने वेढलेल्या मैदानात सुरक्षित सोडलं जातं. सुरुवातीला या अजगरासाठी खाणं शोधण्यासाठी त्यांना अनेक समस्या येत होत्या परंतु आता खाणं शोधणंही सोपं झाल्याचं, मार्कस यांनी सांगितलं.

First published:

Tags: Python, Python snake, Viral videos