मुंबई, 27 नोव्हेंबर : ऑमलेट किंवा अंड्याचा काही पदार्थ बनवताना तुमच्या हातून अंडं निसटून खाली पडलं तर काय होतं?... साहजिकच अंडं फुटतं. जमिनीपासून काही फूट उंच असलेल्या आपल्या हातून अंडं पडून त्याची अशी अवस्था होते. तर विचार करा. जर हेच अंड स्पेस म्हणजे अंतराळातून पृथ्वीवर टाकलं तर त्याचं काय होईल? आता हा प्रयोग तुम्हाला स्वतः करून पाहणं शक्य नाही पण पण काही शास्त्रज्ञांनी हे करून पाहिलं आणि तुम्हाला दाखवलंही आहे.
स्पेसचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. अंतराळातून माणसांनी पृथ्वीवर उडी मारल्याचेही व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण कधी अंडं स्पेसमधून जमिनीवर फेकल्याचं तुम्ही पाहिलं नसेल. स्पेसमधून जमिनीवर फेकलेल्या या अंड्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
युट्यूबर मार्क रॉबरने आपल्या यूट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. रॉबर हा नासाचा इंजिनीअरही होता. आपल्या यूट्युब हा आपले गॅजेट्स आणि सायन्सचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. रॉबर आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी मिळून अंड्याचा हा प्रयोग करून पाहिला. या वर्षीच त्याने या प्रयोगाची सुरुवात केली होती. शुक्रवारी याचा व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे.
हे वाचा - Shocking Video! जेवणाच्या ताटात अचानक जिवंत झाला मासा; व्यक्ती खाणार तोच त्याने तोंड उघडलं आणि...
रॉबरने सांगितल्यानुसार सुरुवातीला सर्वकाही ठरवल्यानुसार नाही झालं. पण दुसऱ्यांदा सर्वकाही सुरळीत झालं. फक्त एक समस्या होती. रॉकेट पडल्यानंतर त्याचं मुव्हेबल फिन्स कंट्रोलमध्ये नव्हतं. वेदर बलूनसाठी एक रॉकेटच्या आत एक अंड अंतरिक्षच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य होतं. रॉकेट बलूनपासून वेगळी होऊन पुन्हा यावी असं अपेक्षित होतं.
अंतरिक्षमधून अंडं असं टाकायचं होतं की ते तुटलं नाही पाहिजे. सुरुवातीला काही अंडी तुटली होती. एका नियंत्रित वेगाने अंडं खाली फेकण्यात आलं. व्हिक्टर व्हॅलीत हे अंड प़डलं. या अंड्याचं नेमकं काय झालं हे तुम्हीच पाहा.
हे वाचा - एक क्लिक आणि पाहा कसा Bubble बनेल बर्फाचा गोळा; कधीच पाहिला नसेल असा अद्भुत मॅजिक VIDEO
आता तुम्हाला काय वाटतं या अंड्याचं नेमकं काय झालं असेल? तुम्ही म्हणाल आणखी काय होणार, फुटलंच असणार. पण थांबा... व्हिडीओचा शेवट पाहा. शेवट पाहूनच तुम्ही हैराण व्हाल. कारण तुम्हाला वाटतं किंवा नेहमी होतं तसं बिलकुल काही झालं नाही. हे अंडं जसंच्या तसं होतं. त्याला एक क्रॅकही गेली नव्हती.
या प्रोजेक्टसाठी खूप खर्च आला. इंजिनीअर्सना हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली, असं रॉबरने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos