नवी दिल्ली, 29 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोक नवनवीन गोष्टी तयार करत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करुन आत्तापर्यंत अनेक हटके गोष्टी बनवल्या गेल्या आहेत. अशातच यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडलीये. मात्र या तंत्रज्ञानाचा वापर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. वेस्टर्न टॉयलेटमध्ये एका बटनाच्या आधारे तुमच्या शीचं रुपांतर राखेत होतं. हे ऐकून तुम्ही गोंधळून गेला असाल मात्र ही गोष्ट खरी असून याचा एक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला वेस्टर्न टॉयलेटच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर दाखवत आहे. मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली टॉयलेट सीट दाखवण्यात आली आहे. या टॉयलेट सीटचे वैशिष्ट्य म्हणजे शी फ्लश करण्याऐवजी राखेमध्ये बदलता येते. या अनोख्या वॉटरलेस टॉयलेट सीटचा व्हिडिओ @Vanvies नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ही "इको-फ्रेंडली" टॉयलेट सीट बटणाच्या स्पर्शाने विष्ठा कशी जाळते आणि राखेत बदलते, ज्याला वास येत नाही, हे व्हिडिओ दाखवले गेलंय.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "तुम्ही कल्पना करू शकता का की कोणी तुम्हाला सांगेल की एक दिवस तुम्ही तुमची विष्ठा जाळू शकाल, त्याला स्पर्श कराल आणि त्याचा वास येणार नाही? #future" आतापर्यंत दोन लाख पासष्ट हजारांहून अधिक लाईक्स आणि 9 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासह टॉयलेट सीटने इंटरनेट वापरकर्त्यांना आश्चर्यचकित केले. तर काही युजर्सनी कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रश्नही विचारले आहेत.
दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चांगलाच चर्चेत आलाय. पाण्याशिवाय काम करणाऱ्या या टॉयलेट सीटची सध्या जोरदार चर्चा आहे. यापूर्वीही अशा हटके तंत्रज्ञानाचे प्रकार पहायला मिळालेत. आपण विचारही करु शकत नाहीत असे अविष्कार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनवले जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Top trending, Viral, Viral videos