नवी दिल्ली 03 फेब्रुवारी: तुम्हाला डोसा खायला आवडत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही डोसा खाऊन 71000 रुपयेही आपल्या घरी घेऊन जाऊ शकता
(Eat Dosa and Earn Money). फक्त तुम्हाला हा डोसा 40 मिनिटात संपवायचा आहे
(Dosa Challenge). आता तुम्ही विचारात पडला असाल की अशी ऑफर नेमकी कुठे मिळत आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो, की दिल्लीचं एक रेस्टॉरंट ही खास ऑफर देत आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, दिल्लीच्या उत्तमनगरमध्ये स्वामी शक्ती सागर नावाचं एक रेस्टॉरंट आहे. इथे लोकांनी डोसा चॅलेंज पूर्ण केल्यास ते 71000 रुपयांचं बक्षीस आपल्या घरी घेऊन जाऊ शकतात. मात्र, हा साधा डोसा नाही. तर, याची लांबीच 10 फूट आहे. हाच डोसा सध्या लोकांसाठी चॅलेंज बनला आहे. राजधानी दिल्लीतील या रेस्टॉरंटने आपल्या ग्राहकांसाठी खास चॅलेंज ठेवलं आहे.
इथे येऊन डोसा लर्व्हस 71,000 रुपये जिंकू शकतात. मात्र यासाठी त्यांना फक्त 40 मिनिटात 10 फूट लांब डोसा संपवावा लागेल. रेस्टॉरंटचे मालक शेखर कुमार यांनी माहिती दिली की त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये 10 फूट लांब 'डोसा चॅलेंज' सुरू आहे.
रेस्टॉरंटच्या मालकाने सांगितलं, की जो व्यक्ती 40 मिनिटात एकटा हा डोसा संपवेल त्याला आम्ही 71,000 रुपये बक्षीस म्हणून चेकच्या स्वरुपात देऊ. त्यांनी सांगितलं की आधी ते छोटा डोसा बनवत असत, मात्र आता त्यांनी आपल्या ग्राहकांना मोठं चॅलेंज देण्यासाठी हा मोठा डोसा बनवण्यास सुरुवात केली. आधी ते 5, 6 किंवा 8 फुटाचा डोसा बनवत असत. मात्र, आता ते 10 फुटाचा डोसा बनवतात.
रेस्टॉरंटचे मालक शेखर कुमार म्हणाले, की आतापर्यंत 25 ते 26 लोकांनी हे चॅलेंज स्वीकारलं. मात्र, आजपर्यंत कोणीच हे जिंकू शकलं नाही. मालकाच्या म्हणण्यानुसार, या चॅलेंजमध्ये भाग घेण्यासाठी अनेक ठिकाणांहून फोन येत आहेत. या डोस्याची किंमत 1500 रुपये आहे. या चॅलेंजमध्ये भाग घेणाऱ्या एका ग्राहकाने सांगितलं की त्याने हे चॅलेंज स्वीकारलं होतं. मात्र, तो डोसा संपवू शकला नाही आणि हारला. मात्र, हा डोसा अतिशय चविष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.