Home /News /viral /

या रेस्टॉरंटमध्ये पोटभर जेवण करा आणि मिळवा 1 लाख रुपये; फक्त पूर्ण करावी लागेल एक अट

या रेस्टॉरंटमध्ये पोटभर जेवण करा आणि मिळवा 1 लाख रुपये; फक्त पूर्ण करावी लागेल एक अट

या नव्या चॅलेंजमध्ये बाहुबली थाळी खाल्लास तुम्हाला एक लाखाचं बक्षीस मिळणार आहे. बाहुबली थाळीमध्ये तुम्हाला एकूण 30 शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ मिळतील.

    हैदराबाद 26 मे : लॉकडाउन संपल्यापासून अनेक फूड ब्लॉगर्सनी आपले व्हिडिओ पुन्हा ऑनलाइन शेअर करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थांपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत लोक निरनिराळ्या पदार्थांचे व्हिडिओ बनवतात आणि शेअर करतात. अलीकडेच हैदराबादमधील एका रेस्टॉरंटने लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अशी ऑफर आणली आहे, जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. आतापर्यंत अनेक फूड ब्लॉगर्सनी हे चॅलेंज (Food Challenge) शूट करून ऑनलाइन शेअर केलं आहे. यामध्ये तुम्हाला रेस्टॉरंटची बाहुबली थाळी संपवायची आहे (Finish the Dish and Win 1 lakh). पण एका अटीसह. कायच्या काय! कुत्रा बनण्याची हौस पूर्ण करण्यासाठी खर्च केले 11 लाख, फोटो पाहून व्हाल शॉक या नव्या चॅलेंजमध्ये बाहुबली थाळी खाल्लास तुम्हाला एक लाखाचं बक्षीस मिळणार आहे. बाहुबली थाळीमध्ये तुम्हाला एकूण 30 शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ मिळतील. चिकन बिर्याणीपासून ते प्रॉन करी, शेझवान नूडल्स आणि रायता ते सलाड आणि पेयेही उपलब्ध असतील. पण जर तुम्ही असा विचार करत असाल की फक्त ही थाळी खाल्ली की तुम्ही लखपती व्हाल तर तुम्ही चुकीचे आहात. खरं तर, ही थाळी तुम्हाला अवघ्या अर्ध्या तासात संपवायची आहे. होय, हे सर्व अन्न संपवण्यासाठी तुम्हाला फक्त ३० मिनिटं मिळतील. हैदराबादच्या फूड जॉइंटने ही ऑफर सुरू केली आहे. यामध्ये थाळीची किंमत अठराशे रुपये ठेवण्यात आली आहे. ही अठराशे रुपयाची डिश तुम्हाला अर्ध्या तासात संपवायची आहे, असं केल्यास तुम्हाला एक लाख रुपये जिंकता येतील. यामध्ये तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज फूड मिळेल. पण एक लाख जिंकण्यासाठी तुम्हाला कोशिंबीर आणि चटणीसह प्लेटमधील सर्व पदार्थ अर्ध्या तासात संपवावे लागतील. तरच तुम्ही या पुरस्काराचे दावेदार बनू शकाल. आधी पाल असलेली Cold drink दिली आणि नंतर...; McDonald’s मधील संतापजनक प्रकार; Video Viral हैदराबादचे हे फूड चॅलेंज व्हायरल होताच अनेक लोक ते जिंकण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये आले आहेत. ही बाहुबली थाळी संपवण्याच्या इच्छेने प्रत्येकजण इथे येतो पण आजपर्यंत कोणालाच यश आलेलं नाही. या आव्हानात भाग घेण्यासाठी तुम्ही सोमवार ते गुरुवार या कालावधीत प्रयत्न करू शकता. या ऑफरमुळे नुकत्याच उघडलेल्या या फूड जॉइंटमध्ये लोकांची गर्दी झाली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Food, Viral news

    पुढील बातम्या