नवी दिल्ली, 22 मार्च : मागच्या आठवड्यामध्ये पाकिस्तानमध्ये भुकंपाचे धक्के जाणवले. यादरम्यानचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र एका व्हिडीओने लोकांचं खास लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडीओ होता एका न्यूजरुममधील. भुकंपादरम्यानच्या या व्हिडीओमध्ये नेमकं काय होतं याविषयी जाणून घेऊया.
व्हिडिओमध्ये असे दिसून येते की अँकर बातम्या वाचत आहे, जेव्हा जोरदार भूकंप होतो आणि संपूर्ण न्यूजरूम जोरदार हादरायला लागते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या जोरदार हादऱ्यानंतरही अँकर जीवाची पर्वा न करता बातम्या वाचत राहतो. आपण पाहू शकता की काही सेकंदांनंतर न्यूजरूममध्ये उपस्थित असलेले बाकीचे लोक आपला जीव वाचवण्यासाठी धावतात. भूकंपानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक अँकरच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.
Pashto TV channel Mahshriq TV during the earthquake. Bravo anchor continued his live program in the ongoing earthquake.
#earthquake #Peshawar pic.twitter.com/WC84PAdfZ6 — Inam Azal Afridi (@Azalafridi10) March 21, 2023
31 सेकंदांचा हा व्हिडीओ पाकिस्तानातील स्थानिक टीव्ही चॅनलचा असून याचं नाव महश्रिक टीव्ही आहे. @Azalafridi10 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून अॅंकरची प्रशंसा केली जात आहे. अॅंकरचं धाडस पाहून सर्वच थक्क झालेत.
दरम्यान, मागच्या आठवड्यात मंगळवारी भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या फैजाबादपासून 133 किमी आग्नेय दिशेला होता. भुकंपाचे केंद्र जमिनीपासून 56 किमी खोलीवर होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.6 इतकी मोजली गेली. त्याचा परिणाम भारत, पाकिस्तानसह 9 देशांमध्ये दिसून आला. सध्या याचे व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Earthquake, Top trending, Videos viral, Viral