नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : सोशल मीडियावर अनेक शिकारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राण्यांच्या शिकारीच्या थराराचे व्हिडीओ इंटरनेटवरही धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची जास्त पसंती मिळते. अशातच आणखी एक शिकारीचा व्हिडीओ समोर आला असून नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एका शेतात असणाऱ्या सश्यावर गरुड झेप घेत आहे. मात्र सशाने स्वतःला वाचवण्यासाठी जे केलं ते पाहुन तुम्हीदेखील थक्क व्हाल. तसं गरुड सशावर झेप घेण्यासाठी येतं तसं सशा उंच उडी मारत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडीओ पाहून लोक सश्याचे सामर्थ्याचे कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर फिरत असून चांगलाच चर्चेत आला आहे.
खुल्यात गरुडाने सश्यावर झडप घातली कि त्याचे वाचणे अशक्य असते. सश्याने ती धारणा टाकुन शेवटपर्यंत झुंजायचा निर्णय घेतला म्हणुनच वाचला. गरुडासाठी फक्त एकवेळचे जेवण आहोत पण माझी हि अस्तित्वाची लढाई आहे. आपल्याला अशक्यप्राय वाटणाऱ्या किती प्रसंगात अस्तित्वाची लढाई समजुन झुंज देतो ? pic.twitter.com/vdsXTxteOe
— Dr prashant bhamare (@dr_prashantsb) February 3, 2023
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ @dr_prashantsb नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'खुल्यात गरुडाने सश्यावर झडप घातली कि त्याचे वाचणे अशक्य असते. सश्याने ती धारणा टाकून शेवटपर्यंत झुंजायचा निर्णय घेतला म्हणुनच वाचला. गरुडासाठी फक्त एकवेळचे जेवण आहोत पण माझी ही अस्तित्वाची लढाई आहे. आपल्याला अशक्यप्राय वाटणाऱ्या किती प्रसंगात अस्तित्वाची लढाई समजुन झुंज देतो?'
दरम्यान, गरुड आणि सश्याच्या या जबरदस्त झुंजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून नेटकरीही व्हिडीओला चांगली पसंती देत आहेत. या व्हिडीओ आत्तापर्यंत अनेकांनी डबल पाहिला असून व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Top trending, Videos viral, Viral, Viral news