नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : दसरा (Dussehra) हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एक दिवस आधीपासूनच दसऱ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. रावणदहनासाठी सर्वत्र पुतळे उभे केले जात आहे. मात्र यंदा कोरोनामुळे दरवर्षीचा उत्साह दिसणार नाही. मात्र यातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दसऱ्याआधी रावण अॅम्ब्युलन्सवर जाताना दिसत आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर, काही लोकांना 2020मध्ये आता हेच शिल्लक होतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. हा मजेदार व्हिडीओ IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे.
वाचा-जिद्दीला सलाम! लॉकडाऊनआधी होती 10 हजारांची नोकरी, आता कमावतोय दरमहा 80000
2020😳😳
Ravana going in Ambulance to COVID Hospital.... pic.twitter.com/v04Xw1wN8L
— Susanta Nanda IFS (@susantananda3) October 24, 2020
वाचा-आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट VIDEO; हिंसाचार संपविण्यासाठी चांगला पर्याय
हा व्हिडीओ शेअर करताना सुशांत नंदा यांनी, अॅम्ब्युलन्सवर बसून रावणही कोव्हिड-19 रुग्णालयात जात आहे, असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ पाहून लोकं हैराण झाले आहे. लोकांनी 2020मध्ये काहीही होऊ शकतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओमध्ये एका अॅम्ब्युलन्सवर रावणाचा पुतळा दिसत आहे. अॅम्ब्युलन्समधून हा रावणाचा पुतळा दहनासाठी घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वाचा-याला म्हणतात एकीचं बळ! महिलेला वाचवण्यासाठी लोकांनी हलवली अख्खी ट्रेन
काही लोकांनी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता रावणालाही पण कोरोना झाला की काय? असेही प्रश्न विचारले आहेत.