मुंबई, 21 जानेवारी : वाघ, सिंह, बिबट्या यांना साधं आपण व्हिडीओत पाहिलं तरी आपल्याला धडकी भरते. तरी त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचीही तितकीच उत्सुकता असते. त्यामुळे आपण नॅशनल पार्क, जंगल सफारीवर (
Jungle Safari) जातो. तिथं दूरून जरी असे प्राणी दिसले तरी आपल्याला घाम फुटतो. गाडीच्या जवळ आले तर मग बोलतीच बंद होते. मग विचार करा असे प्राणी थेट तुमच्या गाडीतच घुसले तर... फक्त विचार करून निम्मा जीव गेला ना? असं प्रत्यक्षात घडल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे (
Lion enter into vehicle video).
जंगल सफारीवर गेलेल्या पर्यटकांच्या गाडीत चक्क एक सिंह (
Lion video) घुसला आहे. nature27_12 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता काही तरुण गाडीच्या बाहेर उभे आहेत. तर गाडीत चक्क एक सिंह दिसतो आहे. त्या गाडीत एक तरुणीही आहे. सिंह तरुणीला घेरून उभा आहे. इतक्यात बाहेरील एक तरुण गाडीत पुन्हा जातो आणि त्या तरुणीची सिंहाच्या तावडीतून सुटका करतो. तिला सुखरूप गाडीबाहेर काढतो.
हे वाचा - चिमुकल्याची हिंमत तर पाहा! थेट सिंहासमोर गेला आणि...; काय घडलं Must Watch video
अवघ्या 31 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. जो फक्त पाहूनच आपल्या हृदयाची धडधड वाढली. त्या गाडीतील पर्यटकांची अवस्था काय झाली असेल याची कल्पना तुम्हाला आलीच असेल.
यापुढे तुम्ही पाहाल तर एका गाडीच्या मागे झाडाच्या खोडावरही एक सिंह बसलेला दिसतो. गाडीवर बसलेल्या व्यक्तीच्या बरोबर मागेच हा सिंह आहे. हा तरुण हसताना दिसतो आहे तर सिंह त्याच्याकडे पाहतो आहे.
हे वाचा - एका शिकारीसाठी 3 चित्त्यांशी भिडलं एकटं माकड; VIDEO चा शेवट पाहून हैराण व्हाल
सुदैवाने दोन्ही सिंह या व्यक्तीवर हल्ला करताना दिसले नाही. त्यामुळे नेटिझन्सही हैराण झाले आहेत. सिंहांनी या माणसांवर हल्ला का केला नाही, असा प्रश्न बहुतेक नेटिझन्सना पडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.