Home /News /viral /

VIDEO - तुफानी पावसातही जोमात निघाली वरात; भिजू नये म्हणून वऱ्हाड्यांनी केला जबरदस्त जुगाड

VIDEO - तुफानी पावसातही जोमात निघाली वरात; भिजू नये म्हणून वऱ्हाड्यांनी केला जबरदस्त जुगाड

धो धो कोसळणारा पाऊसही वऱ्हाड्यांना वरात काढण्यापासून रोखू शकला नाही.

  भोपाळ, 05 जुलै : पावसाळ्यात लग्न म्हटलं की बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो (Wedding in rain). आता लग्न म्हणजे लग्नाची वरात आलीच. पण आकाशातून कोसळणारा पाऊस, रस्त्यावर साचलेलं पाणी, चिखल... यातून वरात म्हणजे अशक्यच. त्यामुळे या कालावधीत लग्न झाली ही लग्नमंडप ते घर नवरा-नवरी आणि वऱ्हाड्यांना गाडीतच राहावं लागतं. पण एका अशा लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात वऱ्हाडी तुफानी पावसालाही जुमानले नाहीत. भरपावसातही त्यांनी रस्त्यावरून वरात काढली. आपण भिजू नये म्हणून त्यांनी जबरदस्त जुगाडही केला आहे (Wedding baarat in rain). धो धो कोसळणाराही पाऊसही वऱ्हाड्यांना लग्नाची वरात काढण्यापासून रोखू शकला नाही. त्याच उत्साहात, त्याच जोशात पावसातही वरात निघू शकते हे या वऱ्हाड्यांनी दाखवून दिलं आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमधील हे दृश्य आहे. जिथं पावसातही ताडपत्रीत ही लग्नाची अनोखी वरात निघाली. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक गाडी जाताना दिसते. ज्यात नवरदेव बसलेला असावा. त्यानंतर मागून वऱ्हाडी दिसत आहेत. हे वाचा - VIDEO - पावसानं झोडपलं पण वऱ्हाड्यांनी लग्नाचं जेवण सोडलं नाही; खाण्यासाठी केला जबरदस्त जुगाड काही लोक बिनधास्तपणे पावसात भिजत नाचत आहेत. तर बहुतेकांनी आपल्या डोक्यावर ताडपत्री घेतली आहे. लांबलचक प्लॅस्टिक कागद अंगावर घेऊन पाहुणे पायी चालताना दिसत आहेत. या ताडपत्रीच्या आत काही लोक नाचतही आहेत. याआधीही पावसातील लग्नाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात पावसाने झोडपलं तरी पाहुण्यांनी लग्नाचं जेवण सोडलं नाही. पावसात भिजतही त्यांनी आरामात जेवण केलं.
  व्हिडीओत पाहू शकता पाऊस कोसळतो आहे, त्यात आपण भिजू नये, आपल्या ताटात पाणी पडू नये म्हणून सर्वांनी आपल्या डोक्यावर खुर्च्या धरल्या आहेत. एका हातात डोक्यावर खुर्ची आणि दुसऱ्या हाताने लग्नातील जेवणाचा आस्वाद... पावसात भिजत असतानाही या सर्वांनी लग्नातील जेवणावर चांगलाच ताव मारला. हे वाचा - अरे हिला आवरा! DJ Dance करताना इतका जोश चढला की...; महिलेचं 'ते' कृत्य कॅमेऱ्यात कैद mr_90s_kidd_ इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे.  इतक्या पावसातही अगदी आरामात बसून जेवताना पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. तसंच त्यांनी केलेल्या जुगाडाचं कौतुक केलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Monsoon, Rain, Viral, Viral videos, Wedding

  पुढील बातम्या