नवी दिल्ली 27 डिसेंबर : वाघ हा जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. जगातील सर्वात सुंदर आणि भव्य प्राण्यांमध्येही त्यांची गणना केली जाते. तुम्ही प्राणीसंग्रहालयात किंवा वन्यजीव अभयारण्यात नक्कीच गेला असाल. इथे सर्वात रोमांचक बाब म्हणजे विशाल शरीर आणि सुंदर पट्टे असलेला वाघ पाहणे. वाघांशी संबंधित अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Videos of Tiger) होतात. वाघांचे शिकार करतानाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि लोकांनाही असे व्हिडिओ पाहायला आवडतात.
जमिनीवर झोपून शूट करत होती व्हिडिओ; सापाने चेहऱ्यावर केला हल्ला, थरारक VIDEO
सध्या असाच एक वाघाचा आणि बदकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Funny Video of Tiger and Duck) होत आहे. यात दिसतं की वाघ पाण्यात जात बदकाची शिकार करण्याचा प्रयत्न करतो. मात्र बदकालाही समजतं की वाघ त्याला पकडण्याच्या प्रयत्नात आहे. यानंतर तो वाघासोबत लपंडाव (Hide and Seek) खेळण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वाघ अतिशय आरामात हळूहळू बदकाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून बदकाला वाघ आल्याचं समजू नये. मात्र बदकाला वाघ जवळ आल्याचं लगेचच समजतं आणि तो पाण्याच्या आत जातो. बदक लांब जाऊन पाण्याच्या बाहेर निघतो. वाघ जवळ जाऊ लागताच बदक लगेचच पाण्याच्या आत जात राहतो.
Playing hide and seek.. 😅 pic.twitter.com/foCNauJu1N
— Buitengebieden (@buitengebieden_) December 26, 2021
हा मजेशीर व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ @buitengebieden_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लपाछपी खेळत आहेत, असं लिहिलं आहे. अवघ्या 46 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 28 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर 5 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे.
दुचाकी घेऊन थेट नदीत गेला तरुण अन्...; फजिती पाहून लावाल डोक्याला हात, VIDEO
अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, 'निसर्गाचे सौंदर्य. पक्षी उडण्यास असमर्थ आहे, परंतु बलाढ्य शिकारीपासून वाचण्यासाठी निसर्गाने त्याला इतका चांगला गुण दिला आहे'. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Tiger