मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भरसमुद्रात अग्नितांडव! जहाजाला लागलेल्या आगीचा धक्कादायक VIDEO

भरसमुद्रात अग्नितांडव! जहाजाला लागलेल्या आगीचा धक्कादायक VIDEO

जहाजाला (Yatch) आग (fire) लागल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) होतो आहे.

जहाजाला (Yatch) आग (fire) लागल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) होतो आहे.

जहाजाला (Yatch) आग (fire) लागल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) होतो आहे.

  • Published by:  Priya Lad

ओमान, 10 जानेवारी :  निळ्याशार समुद्रात जहाजाला (yatch) भीषण आग (fire) लागली आहे. दुबईच्या (dubai) ओमानमधील (oman) हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये भरसमुद्रात जहाज आगीच्या विळख्यात सापडल्याचं दिसतं आहे ही आग इतकी भीषण आहे की आगीच्या ज्वाला वेगानं संपूर्ण जहाजात पसरत आहेत. पाहता पाहता संपूर्ण जहाज आगीत सापडतं. मोठ्या प्रमाणात धुराजे लोटही पसरले आहेत.

या व्हिडीओमध्ये भरसमुद्रातील हा अग्नितांडव पाहू शकता. ही घटना कधीची आहे माहिती नाही. पण सोशल मीडियावर व्हायल होते आहे. मिळालेल्या माहितीनुसार जहाज दुबाईहून सुदानला निघाले होतं. त्याचदरम्यान ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जातं आहे.

ओमान इथे मोशिशजवळ 4 कंटेनरमध्ये आग लागली आणि ती जहाजभर पसरली.  या जहाजावर असलेल्या 8 क्रू मेंबरनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारली. समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या मच्छीमारांनी या क्रू मेंबर्सना वाचवलं आहे.

हे वाचा  - ...आणि कांगारूनं चक्क वाघालाच मिठी मारली; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

जहाजाला आग लागण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीदेखील भरसमुद्रात बऱ्याच जहाजांना आगी लागल्या आहेत. ऑगस्ट 2020 मध्येही इटलीतील सार्डिनियाच्या किनारपट्टीवर असाच भयंकर अपघात झाला.  समुद्रातच असलेल्या एका जहाजाला (Yacht) आग लागली. स्थानिक तटरक्षक दलानं ही आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही क्षणात संपूर्ण जहाज जळू लागले. कोस्ट गार्डनं शूट केलेल्या या व्हिडीओमध्ये हे Yacht जळताना दिसत आहे. एवढेच नाही तर अख्खं जहाज एका क्षणात पाण्यात बुडालंही.

" isDesktop="true" id="512440" >

metre superyacht Lady MM असे या जहाजाचे नाव. कोस्टा स्मेराल्डापासून 50 मैलांच्या अंतरावर त्याला आग लागली. आग लागली तेव्हा त्यात 17 प्रवाशी उपस्थित होते. यातील नऊ क्रू मेंबर्स आणि कझाकस्तानमधील आठ प्रवाशी होते. हे जहाज जळत असल्याचे ऑल्बिया येथील कोस्ट गार्डला सिग्नल द्वारे 25 ऑगस्टला कळलं आणि मदत करण्यासाठी दोन बोटी आणि एक हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं.  काही तासांनंतर जळत्या जहाजातील क्रू मेंबर्ससह प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

हे वाचा  - अवघड आहे! दुचाकी आहे की 7 सीटर? पोलिसाने भररस्त्यात बाबांसमोर हातच जोडले

त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये  श्रीलंकेच्या MT New Diamond या तेल जहाज 3 दिवस धगधगत होतं.  हजारो टन तेल असलेलं हे हजार श्रीलंकेतून भारताकडे येत होतं. मात्र काही अंतर कापल्यानंतर या जहाजाला आग लागली. समुद्रातल्या वेगवान वाऱ्यामुळे ही आग चांगलीच भडकली होती. श्रीलंकेने भारतीय नौदलाला मदतीची विनंती केली. त्यानंतर भारतीय नौदलाच्या बचाव पथकाने धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर आगीवर ताबा मिळवण्यास अधिकाऱ्यांना यश आलं. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली होती.

First published:

Tags: Fire, Social media viral, Viral, Viral videos