चंदीगड, 08 नोव्हेंबर : बऱ्याचदा आपली मजा अनेकांसाठी सजा बनते. मस्करीची कुस्करी होते आणि मजा जीवघेणीही ठरू शकते. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. काही तरुणांची मजा एका वृद्धाच्या जीवावर बेतली आहे. तरुणांनी असं काही तरी केलं की त्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हरयाणाच्या गुरुग्राममधील ही धक्कादायक घटना आहे.
तरुणांमध्ये स्टंटची क्रेझ खूप आहे. मग ते स्वतःच्या जीवाची पर्वा तर करत नाहीत पण स्वतःमुळे इतरांचाही जीव धोक्यात टाकतात. या घटनेतही तसंच झालं आहे. काही तरुण कार स्टंट करत होते. त्यावेळी त्यांनी बऱ्याच लोकांना धडक दिली. ज्यात एकाचा मृत्यू झाला आहे. ही भयंकर दुर्घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हे वाचा - फक्त गाडीला टेकल्याची इतकी मोठी शिक्षा; 6 वर्षांच्या चिमुकल्याला कार मालकाने...; संतापजनक VIDEO
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता काही लोक रस्त्याच्या शेजारी दिसत आहेत. इतक्यात समोरून एक पांढऱ्या रंगाची कार येते. कार भरधाव वेगाने येते. रस्त्याच्या मध्ये आल्यावर कारचालक कारला ब्रेक मारून कार टर्न करण्याचा प्रयत्न करतो पण कार इतकी वेगात असते की टर्न होतानाही ती रस्त्यावरून पुढे जाते आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या लोकांना धडकते.
कार इतक्या जोरात टक्कर मारते की कारच्या मागील भागगी तुटतो. त्यानंतर कारचालक आपली गाडी घेऊन तिथून पसार होतो.
या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहे.
हे वाचा - ड्रायव्हिंग टेस्ट इतकी अवघड? Video पाहून भल्याभल्यांना फुटला घाम
घटनेनंतर कार स्टंट करणाऱ्या सात तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. माहितीनुसार हे सर्वजण नशेत कार स्टंट करत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Haryana, Viral, Viral videos