मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - दारूड्याला वाचवण्यासाठी देवदूत बनून धावले नागरिक; एकत्र येत मृत्यूच्या दाढेतून खेचून काढलं

VIDEO - दारूड्याला वाचवण्यासाठी देवदूत बनून धावले नागरिक; एकत्र येत मृत्यूच्या दाढेतून खेचून काढलं

एका दारूड्याचा डोळ्यासमोर जीव जाताना पाहून नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी धडपड केली.

एका दारूड्याचा डोळ्यासमोर जीव जाताना पाहून नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी धडपड केली.

एका दारूड्याचा डोळ्यासमोर जीव जाताना पाहून नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी धडपड केली.

  मुंबई, 10 ऑगस्ट : रस्त्यात एखादी व्यक्ती दारूच्या नशेत पडली असेल तर बऱ्यादा तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. दारूडा म्हणून कुणीच तिच्याकडे ढुंगूनही पाहत नाही. अशी व्यक्ती रस्त्याने चालताना शरीरावर नियंत्रण राहत नसल्याने तिचा तोल जात असेल तर बरेच लोक तिच्याकडे पाहून हसू लागतात, तिची मजा घेतात. पण या जगात माणुसकी अद्यापही जिवंत आहे हे काही लोकांनी दाखवून दिलं आहे. मृत्यूच्या दाढेत गेलेल्या एका दारूड्याला कित्येक नागरिकांनी मृत्यूच्या दारातून खेचून बाहेर काढलं आहे. नागरिकांनी एका दारूड्याचा जीव वाचवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. दारूड्यासाठी हे सामान्य नागरिक देवदूत बनून धावून आले. सर्वांनी एकत्र येत त्याचा जीव वाचवला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक नशेत असलेली ही व्यक्ती रस्त्यावरून चालते आहे. त्याचवेळी ती एका बाईकच्या समोर येते. बाईकस्वार या व्यक्तीवर भडकलेला दिसतो आहे. नंतर बाईकस्वार तिथून निघून जातो आणि ही व्यक्ती फूटपाथवर येण्याचा प्रयत्न करते. तिथंच काही लोक उभे आहेत, जे या नशेत असलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवून आहेत. त्यापैकी एकजण व्हिडीओही बनवतो आहे. हे वाचा - VIDEO - लेकाच्या दिशेने आला मृत्यू; सुपरहिरोसारखा अवघ्या एका सेकंदात बाबाने वाचवला जीव जेव्हा ही व्यक्ती फूटपाथजवळ येते तेव्हा तिथंच एक गटार आहे. जिथं रस्त्यावरील पाणी जात आहे. पावसाच्या पाण्यात तिथं गटार आहे हे समजावं आणि तिथं चुकून कुणी जाऊ नये म्हणून एक साइन बोर्डही लावण्यात आला आहे. तिथं येताच या व्यक्तीचा तोल जातो आणि ती थेट त्या गटारात जाते.
  तिथं असलेले लोक हे पाहतात आणि धावत त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जातात. एक व्यक्ती क्षणाचाही विचार न करता तिथला बोर्ड बाजूला फेकून देते आणि त्या गटाराच्या तोंडावर खाली उतरून हात टाकून ती व्यक्ती सापडते का पाहते. पाण्याचा वेगही तुम्ही पाहू शकता. या वेगात ही व्यक्ती पुढे वाहत गेली आहे. पुढे जिथं गटार खुलं आहे तिथंही काही लोक उभे राहतात. सुदैवाने तिथून ही व्यक्ती वाहत जाताना दिसते आणि काही लोक लगेच तिथं हात टाकून या व्यक्तीला धरतात आणि खेचून बाहेर काढतात. हे वाचा - OMG! ट्रकच्या 3 चाकांखाली चिरडला तरी जिवंत राहिला; कसा झाला चमत्कार पाहा Shocking Video या व्यक्तीचं नशीब बलवत्तर म्हणून देवदूताच्या रूपाने इतके नागरिक त्याच्यासाठी धावून आले. जर कुणाचं लक्ष नसतं किंवा ही घटना कुणी नसताना रात्रीच्या वेळी घडली असती तर ही व्यक्ती कुठे गायब झाली, तिचं काय झालं याचा कुणाला थांगपत्ताही लागला नसता.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos

  पुढील बातम्या