Home /News /viral /

OMG - अखेर तिला उलटं करत पाय खेचून बाहेर काढलं; दारूच्या नशेत महिलेसोबत भयंकर प्रकार

OMG - अखेर तिला उलटं करत पाय खेचून बाहेर काढलं; दारूच्या नशेत महिलेसोबत भयंकर प्रकार

महिला इतकी दारू प्यायली की त्यानंतर तिच्यासोबत जे घडलं ते पाहून धडकी भरेल पण हसूही आवरणार नाही.

    लंडन, 19 एप्रिल : दारू प्यायल्यानंतर नशा चढते आणि नशेत व्यक्ती काय करतात याचं भान बऱ्याचदा त्यांनाही राहत नाही. ना त्यांचा त्यांच्या तोंडावर ताबा असतो आणि शरीरावर. दारूच्या नशेत त्या व्यक्ती असं काही करतात किंवा त्यांच्यासोबत असं काही घडतं की शुद्धीवर आल्यानंतर त्यांना त्यांचीच लाज वाटते. अशाच टल्ली झालेल्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दारूच्या नशेत असलेल्या या महिलेसोबत भयंकर प्रकार घडला आहे (England woman stuck upside down behind sofa). यूकेतील 40 वर्षांची लिंडसे क्लार्क (Lindsay Clark) तिची मैत्रीण जॅकसनचा वाढदिवस होता.  नॉर्थ शील्ड्समधील ट्वेल्वह ट्वेंटी फाइव्ह रेस्टॉरंटमध्ये तिच्या वाढदिवसाची पार्टी होती. लिंडसे आपल्या मित्रमैत्रिणींसह या रेस्टॉरंटमध्ये पार्टीला गेली. लिंडसने पार्टीत खूप दारू प्यायली. ती इतकी दारू प्यायली की तिला नीट उभंही राहता येत नव्हतं. अशा परिस्थितीत ती असं काही करायला गेली की चांगलीच अडकली. हे वाचा - अरारारा खतरनाक! 'पापा की परी'चं थरारक करतब; VIDEO पाहून भल्याभल्यांची हवा टाइट डेली स्टारच्या रिपोर्टनुसार ज्या सोफ्यावर ते लोक बसले होते, त्याच्या एका कोपऱ्यावर तिच्या एका मित्राचं जॅकेट होतं. ते जॅकेट सोफ्याच्या मागच्या बाजूला पडलं. लिंडसे ते जॅकेट उचलण्यासाठी सोफ्याच्या मागच्या बाजूला वाकली. तिचा हात जॅकेटपर्यंत पोहोचला नाही म्हणून ती पूर्णपणे वाकली. नशेत असल्याने तिचा तोल ढासळला आणि ती सोफ्यात घुसली. तिचं डोकं खाली आणि पाय वर झाले. पाय हवेत लटकत राहिले. तिचं शरीर सोफा आणि भिंतीमध्ये अडकलं होतं. ती अशा ठिकाणी आणि अशा अवस्थेत अडकली होती की तिचं बाहेर पडणं किंवा बाहेर काढणं कठीण होतं. अखेर रेस्टॉरंटचे कर्मचारी तिच्या मदतीला आले. दोन कर्मचाऱ्यांनी तिचे दोन्ही पाय धरले आणि तिच्या पायांना धरून तिला तसंच उलटं खेचलं. बऱ्याच प्रयत्नानंतर ती तिथून बाहेर आली. कर्मचाऱ्यांनी तिच्या पायांना धरून तिला खेचून बाहेर काढलं (Waiters lifted woman from legs who stuck behind sofa upside down). हे वाचा - कुस्ती पाहण्यासाठी आलेली तरुणीच आखाड्यात उतरली; पैलवानांची केली जबर धुलाई, Video Viral तिच्या मित्रमैत्रिणींनी हा व्हिडीओ बनवला आणि फेसबुकवर शेअर केला. रेस्टॉरंटनेही हा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. व्हिडीओ पाहून बहुतेकांना हसू आवरलं नाही. व्हिडीओत पाहू शकता ज्यावेळी हे सर्व घडलं तेव्हा तिथं उपस्थित असलेला प्रत्येक जण हसताना दिसतो आहे. अगदी लिंडसेही जेव्हा तिथून बाहेर येते तेव्हा तिलाही हसू आवरत नाही.  तिने सांगितलं की, तिच्या शरीराला थोडी दुखापतही झाली आहे कारण सोफ्याचा मागील भाग लाकडाचा होता.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या