Home /News /viral /

VIDEO: दारूच्या नशेत थेट ट्रेनच्या इंजिनखाली जाऊन झोपला व्यक्ती; पुढे काय घडलं पाहा

VIDEO: दारूच्या नशेत थेट ट्रेनच्या इंजिनखाली जाऊन झोपला व्यक्ती; पुढे काय घडलं पाहा

एक व्यक्ती इतका मद्यधुंद झाला की तो स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनखालीच जाऊन झोपला. यानंतर लोकांना तिथे येऊन त्याला इथून बाजूला करावं लागलं.

    भोपाळ 23 मे : दारूच्या नशेत असलेले लोक काहीही हास्यापद कृत्य करतात. लोक नशेत अनेकदा अशा चुका करतात की जेव्हा ते शुद्धीवर येतात तेव्हा त्यांनाच त्याची लाज वाटते. अलीकडेच मध्य प्रदेशातील एका रेल्वे स्थानकावर असाच प्रकार घडला. यात एक व्यक्ती इतका मद्यधुंद झाला की तो स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनखालीच जाऊन झोपला. यानंतर लोकांना तिथे येऊन त्याला इथून बाजूला करावं लागलं. वाळवंटात नवरदेवाचा हात पकडून धावणं भोवलं; नवरीसोबत नको ते घडलं, Video Viral न्यूज18 एमपीचे रिपोर्टर शरद श्रीवास्तव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये लोक एका व्यक्तीला ट्रेनच्या खालून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत (Man sleeping under train engine). पहिल्यांदा बघून तुम्हाला वाटेल की ती व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा अपघातात ट्रेनखाली आली असेल, पण व्हिडिओचं कॅप्शन वाचल्यावर सत्य कळेल. कॅप्शननुसार, हा व्यक्ती दारूच्या नशेत ट्रेनखाली जाऊन झोपला. याची माहिती मिळताच त्याला तिथून बाहेर काढण्यात आलं. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "दोन पेग मारल्यावर, रेल्वे ट्रॅक आणि ट्रेनचं इंजिन सर्व मखमली दिसतं. दृश्य ग्वाल्हेरचं आहे. सुदैवाने या व्यक्तीचा जीव वाचला.” व्हिडिओमध्ये (Shocking Video Viral) एक व्यक्ती रुळावर, ट्रेनच्या इंजिनखाली झोपलेला दिसतो. अनेकजण एकत्र येत त्याला बाहेर काढताना दिसत आहेत. स्वतः उठून चालण्याइतपतही तो शुद्धीवर नाही. यानंतर सर्वजण मिळून त्याला इंजिनखालून बाहेर काढतात. व्हिडिओच्या शेवटी समजतं की हा ग्वाल्हेर स्टेशनवरील व्हिडिओ आहे. सिंहासोबत करत होता मस्ती; भडकलेल्या जंगलाच्या राजाने हात जबड्यात पकडला अन्.., Shocking Video दारूच्या नशेत एखाद्याने असं विचित्र कृत्य केल्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी हरियाणातूनही अशीच बातमी आली होती. यात महेंद्रगडच्या माजरा खुर्द गावात मद्यधुंद शिक्षक सरकारी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आले होते. गुरुजींचं हे कृत्य पाहून कर्मचारी आणि ग्रामस्थांनी 112 वर माहिती देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा गुरुजींना चालताही येत नव्हतं. दोन पोलिसांनी गुरुजींना आधार देत गाडीत बसवलं आणि पोलीस ठाण्यात नेलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking video viral, Train

    पुढील बातम्या