Home /News /viral /

दारूच्या नशेत तरुण स्वतःच्याच चेहऱ्यावर Tattoo काढायला गेला शेवटी...; VIDEO पाहून नेटिझन्स शॉक

दारूच्या नशेत तरुण स्वतःच्याच चेहऱ्यावर Tattoo काढायला गेला शेवटी...; VIDEO पाहून नेटिझन्स शॉक

Drunk man made weird tattoo on face : आरशाऐवजी त्याने मोबाईलचा कॅमेरा ऑन करून त्याच्यासमोर आपल्या चेहऱ्यावर टॅटू काढला आणि शुद्धीवर येताच धक्का बसला.

    मुंबई, 18 मे : दारूच्या नशेत व्यक्ती कधी काय करेल सांगू शकत नाही. किती तरी व्यक्ती नशेत असं काहीतरी करून बसतात की जेव्हा त्यांना शुद्ध येते तेव्हा त्यांनाच लाज वाटते. किंवा आपण हे केलं आहे, यावर त्यांचा विश्वासही बसत नाही. अशाच एका तरुणाने दारूच्या नशेत असं काही केलं की त्याच्यासह त्याला पाहणाऱ्या इतरांनाही धक्का बसला आहे. या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे (Drunk man made weird tattoo on face). @crisggrim नावाच्या टिकटॉक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात या तरुणाने नशेत केलेला प्रताप समोर आला आहे. या व्यक्तीने नशेत आपल्या चेहऱ्यावर असा टॅटू काढला की शुद्धीवर येताच चेहरा पाहून त्याला धक्काच बसला. त्याने स्वतःच स्वतःच्या हाताने आपल्या चेहऱ्यावर टॅटू काढला आणि जो पाहून लोक शॉक झाले आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार टॅटू काढताना त्याने एका हातात आपला फोन धरला आणि दुसऱ्या हातात टॅटू गन धरली. टॅटू काढताना तो आरशाऐवजी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात पाहत होता.  फोनमध्ये पाहत त्याने टॅटू काढला खरा. पण हा टॅटू म्हणजे उलटा क्रॉस होता. हे वाचा - वर्षभराच्या चिमुकल्याचा स्वॅग! नकली टॅटू आणि दागिने घालून आईने बनवलंय 'ठग' तरुणाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही लोकांनी त्याने हे मुद्दामहून केल्याचं म्हटलं आहे. काही युझर्सनी तो शुद्धीवर आल्यावर त्याला पश्चाताप होईल असं म्हटलं. यावर प्रतिक्रिया देताना त्याने आपल्याला कोणताच पश्चाताप होत नसल्याचं म्हटलं आहे. नशेत असा विचित्र टॅटू काढून घेण्याची हे पहिलं प्रकरण नाही. याआधीही अशी बरीच प्रकरणं समोर आली आहेत. महिलेने नशेत शरीरावर गोंदवलं अज्ञात पुरुषाचं नाव इंग्लंडमधील हेरफोर्ड येथे राहणारी 32 वर्षीय कायली विल्यम्सने 2012 मध्ये आपल्या शरीरावर नशेत अज्ञात पुरुषाचं नाव गोंदवून घेतलं. कायली आणि तिची मैत्रीण पार्टी करून पबमधून बाहेर आल्या, तेव्हा त्या एका टॅटू शॉपच्या बाहेर पोहोचल्या. जिथे काही स्पॅनिश पुरुष उभे होते. ते पुरुष या दोघींसोबत बोलू लागले आणि मग एका व्यक्तीने त्यांना एक विचित्र चॅलेंज दिलं. त्याने कायलीला तिच्या हिपवर आपल्या नावाचा टॅटू काढण्याचं चॅलेंज दिलं. कायली शुद्धीवर नव्हती, म्हणून लगेचच तिने या व्यक्तीला होकार दिला. पण तिने अट ठेवली की टॅटू काढण्याचे पैसे या व्यक्तीलाच द्यावे लागतील. हे ऐकून त्या व्यक्तीलाही आश्‍चर्य वाटलं, पण तोही मस्ती करण्याच्या मूडमध्ये होता, म्हणून त्याने होकार दिला. हे वाचा - दारूच्या नशेत तरुणीने केला भलताच प्रताप; शुद्धीवर येताच बसला 'जोर का झटका' डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कायलीने तिच्या हिपवर 'डॅनियल फोर्ड' नावाचा टॅटू काढला आहे. या गोष्टीला 10 वर्ष झाले आहेत, तिला डॅनियलचा चेहराही आठवत नाही किंवा त्याच्याबद्दल काहीच माहिती तिला नाही. तो तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता. अशा स्थितीत आपल्या अंगावर एखाद्या अनोळखी व्यक्तीचा टॅटू गोंदवून घेतल्यानं तिला आजही हसूही येतं आणि पश्चातापही होतो. तो प्रसंग आठवून तिचे मित्र-मैत्रिणी आजही तिच्यावर हसतात.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral news

    पुढील बातम्या