दारूच्या नशेत 3.5 कोटींच्या पॉर्शचा केला चुराडा, अपघाताची भीषणता दाखवणारे PHOTOS समोर

दारूच्या नशेत 3.5 कोटींच्या पॉर्शचा केला चुराडा, अपघाताची भीषणता दाखवणारे PHOTOS समोर

भीषण अपघातानंतर गाडीचे PHOTOS पाहून तुम्हीही व्हाल अवाक्.

  • Share this:

जोहान्सबर्ग, 21 सप्टेंबर : दारू पिऊन गाडी चालवण्यावर (drink and drive) बंदी असली तरी असे प्रकार सर्रास घडताना दिसतात. परिणामी भीषण अपघात झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत. असाच एक भयंकर अपघात दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे घडला. दारूच्या नशेत तरुणाने पोलीस व्हॅनला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणाचा मृत्यू झाला नाही मात्र पोलीस अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे.

दारूच्या नशेत गाडी चालवणारा हा तरूण कोणती साधी-सुधी गाडी नाही पॉर्श (Porsche) गाडीचं टॉप मॉडल चालवत होता. या गाडीची किंमत अंदाजे 3-3.5 कोटी आहे. हा अपघात इतका भीषण होता की एका क्षणात या गाडीचा चुराडा झाला. या अपघाताची भीषणताच दाखवणारे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-हायवेवर गाडीबाहेर लटकून शूट करत होती VIDEO, अचानक उघडला दरवाजा आणि...

वाचा-गर्लफ्रेंडला पटवण्यासाठी भाड्याने घेतली 1.5 कोटींची गाडी, रस्त्यातच धडकली आणि...

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक मिम्सही तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, दारूच्या नशेत गाडी चालवत असताना पोलिसांनी या तरूणाला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानं गाडी थांबवली नाही. मात्र काही अंतरावर जाऊन त्यानं पोलीस व्हॅनलाच धडक दिली. या अपघातामुळे पोलीस व्हॅनचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

वाचा-VIDEO : यांना कोरोना आणि जीवाची भीतीच नाही, भररस्तत्यात सुरू आहे स्टंटचा थरार

पोर्श गाडीची या अपघातात झालेली अवस्था पाहून सोशल मीडियावर लोकांनी दु:ख व्यक्त केले आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 21, 2020, 7:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading