मराठी बातम्या /बातम्या /Viral /दारूच्या नशेत थेट आगीत जाऊन पडला तरुण अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

दारूच्या नशेत थेट आगीत जाऊन पडला तरुण अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

व्हिडिओमध्ये पार्टीसोबतच त्याठिकाणी शेकोटी पेटवलेली दिसते. मात्र त्यानंतर अचानक इथे असं काही घडतं, जे पाहून युजर्सना चांगलाच धक्का बसला.

व्हिडिओमध्ये पार्टीसोबतच त्याठिकाणी शेकोटी पेटवलेली दिसते. मात्र त्यानंतर अचानक इथे असं काही घडतं, जे पाहून युजर्सना चांगलाच धक्का बसला.

व्हिडिओमध्ये पार्टीसोबतच त्याठिकाणी शेकोटी पेटवलेली दिसते. मात्र त्यानंतर अचानक इथे असं काही घडतं, जे पाहून युजर्सना चांगलाच धक्का बसला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 25 मार्च : आजकाल शहरांपासून खेड्यापर्यंत सगळ्याच ठिकाणचे लोक दारूच्या व्यसनात बुडालेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर पार्टीदरम्यान अनेकदा आपली मित्रमंडळीही दारू पिताना दिसतात. यादरम्यान काही लोक अति मद्यपान केल्यामुळे नशेच्या अवस्थेत काही विचित्र कृत्य करताना दिसतात. जे पाहिल्यानंतर युजर्सना हसू आवरत नाही. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

VIDEO: उत्साहाच्या भरात खुर्चीवर चढून नाचू लागला; पुढच्याच क्षणी असा आपटला की सगळेच शॉक

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही मित्र रात्रीच्या अंधारात एका ठिकाणी पार्टी करताना आणि मजा करताना दिसत आहेत. त्यादरम्यान ते दारूच्या नशेत असल्याचं दिसतं. व्हिडिओमध्ये पार्टीसोबतच त्याठिकाणी शेकोटी पेटवलेली दिसते. मात्र त्यानंतर अचानक इथे असं काही घडतं, जे पाहून युजर्सना चांगलाच धक्का बसला. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत थेट आगीवर पडताना दिसते.

सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर हिमालयन रूट्स नावाच्या पेजवर हा शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये काही मुलं दारूच्या नशेत शेकोटी पेटवून बसले असल्याचं दिसतं. यादरम्यान एक तरुण दारूच्या नशेत उभा राहतो आणि त्याला स्वतःचा तोल सावरत नाही. यानंतर भान हरपून तो थेट आगीवर जाऊन पडतो. हे दृश्य पाहून यूजर्सलाही घाम फुटला.

सुदैवाने हा तरुण आगीवर पडताच त्याच्या मित्राने लगेच त्याला उचलून जळण्यापासून वाचवलं. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सर्वांना चकित करत आहे. हा व्हिडिओ पाहून काही यूजर्सला हसू आवरत नाहीये. तर काहींनी हे शॉकिंग असल्याचं म्हटलं आहे. काही यूजर्स यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, 'तिथे बाकी कोणी नसतं तर सकाळपर्यंत त्याचे पकोडे बनले असते.'

First published:
top videos

    Tags: Fire, Shocking video viral