दुबई, 22 सप्टेंबर : दारू पिऊन गाडी (Drink and Drive) चालवणं धोक्याचे असले तरी हल्ली सर्रास असे प्रकार घडताना दिसतात. असाच एक भयंकर अपघात युएइमध्ये घडला. या अपघाताची भीषणता पाहता हा व्हिडीओ गृह मंत्रालयाच्या वतीने शेअर करण्यात आला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. या व्हिडीओमध्ये एक दुचाकी चुकीच्या पद्धतीने टर्न घेऊन दुसऱ्या बाजूला आलेली दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये ट्रॅफिक असलेल्या रस्त्यावर अचानक या दुचाकीनं टर्न घेतल्यामुळे समोर येणाऱ्या गाड्यांवर ही गाडी आदळली. दरम्यान, तपासणी केल्यानंतर वाहनचालक नशेत असल्याचे आढळून आले, अशी माहिती मंत्रालयाने दिली.
वाचा-...आणि हायवेवर लेन सोडून एकमेकांवर आदळल्या 4 गाड्या, भीषण अपघाताचा VIDEO VIRAL
हा भीषण अपघात रविवारी पहाटेच्या सुमारास घडला. मोटार चालकाकडून घेतलेल्या नमुन्यांमध्ये हा चालक नशेत गाडी चालवत असल्याचे समोर आले. तपासात असेही स्पष्ट झाले आहे की, चालक दारू पिऊन गाडी चालवत होता. त्याचवेळी हा भीषण अपघात झाला. या अपघाताचा व्हिडीओ गृह मंत्रायलाने ट्वीट केला आहे.
वाचा-धरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO
سائق "حادث أم القيوين" قاد مركبته تحت تأثير الكحول
UAQ collision motorist was driving under the influence
https://t.co/yqAxfVXcwW pic.twitter.com/X8SnttXi9x
— MOIUAE (@moiuae) September 21, 2020
वाचा-दारूच्या नशेत 3.5 कोटींच्या पॉर्शचा केला चुराडा, अपघाताची भीषणता दाखवणारे PHOTO
या अपघातात गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेल्या एकाचा मृत्यू झाला. दर दुसऱ्या कारचा चालक आणि शेजारील प्रवासी यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर दारू पिऊन गाडी न चालवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहेत. याआधी अशा अनेक घटना समोर आल्या होत्या.