मराठी बातम्या /बातम्या /Viral /त्या सवयीमुळे पतीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली पत्नी, पण तो डॉक्टरच्याच प्रेमात पडला अन्...

त्या सवयीमुळे पतीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली पत्नी, पण तो डॉक्टरच्याच प्रेमात पडला अन्...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी महिलेनं पतीला एका लेडी डॉक्टरकडे नेलं. पण काही आठवड्यातच नवरा त्या डॉक्टरच्या प्रेमात पडला आणि नंतर..

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 08 जानेवारी : 38 वर्षीय महिलेचा पती कोकेनचा व्यसनी होता. त्याला ड्रग्जचं व्यसन होतं. या व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी महिलेनं पतीला एका लेडी डॉक्टरकडे नेलं. पण काही आठवड्यातच नवरा त्या डॉक्टरच्या प्रेमात पडला आणि नंतर त्याने आपल्या पत्नीला सोडलं. ही गोष्ट खुद्द महिलेनंच सांगितली आहे. पतीनं तिचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचं तिनं म्हटलं आहे.

पुजाऱ्याने महिलेला लाथ मारून केस ओढत मंदिराबाहेर काढलं; संतापजनक VIDEO, काय आहे प्रकरण?

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार , महिलेचं नाव जेमिमा जेरार्ड आहे आणि ती ब्रिटनच्या Barnsley ची रहिवासी आहे. जेरार्डने सांगितलं की जेव्हा तिला समजलं की तिचा पती जेमी याला दर आठवड्याला ५० हजार रुपयांचं कोकीन घेण्याची सवय आहे, तेव्हा ती काळजीत पडली. महिलेनं पतीवर उपचार करण्यासाठी एका चॅरिटेबल संस्थेशी संपर्क केला.

इथे एका लेडी काउन्सिलरने 37 वर्षीय जेमीची ट्रीटमेंट सुरू केली. मात्र काहीच आठवड्यांनी जेमी त्याच काउन्सिलरच्या प्रेमात पडला. इतकंच नाही तर यासाठी त्याने आपली पत्नी जेरार्डलाही सोडलं. जेरार्डला आधीच्या पतीपासून तीन मुलं आहेत. २०१५ मध्ये ती जेमीला भेटली. 2018 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्याच वर्षी त्यांना एक बाळ झालं. मात्र त्याच्या सुखी संसाराला तेव्हा ब्रेक लागला, जेव्हा जेमीला ड्रग्जची सवय लागली. यामुळे कपलवर भरपूर कर्ज झालं. कर्ज फेडण्यासाठी त्यांना कार विकावी लागली. तिने पतीला रिहॅब सेंटरमध्ये पाठवलं.

तरुणीने जॉब सोडताच स्वत:च्याच श्रद्धांजलीचा आखला प्लान, कारण ऐकून चक्रावाल!

परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून जेरार्डने पतीला उपचारासाठी रिहॅब सेंटरमध्ये पाठवलं. मात्र तिथेच तो लेडी काउन्सिलरवर फिदा झाला आणि त्याने आपलं कुटुंब सोडलं.

जेरार्डने म्हटलं, की पतीच्या या कृत्याने मी खूप दुःखी झाले. मी आमचं लग्न वाचवण्यासाठी त्याला उपचारासाठी दाखल केलं. मात्र त्याने मला फसवलं. आता तिच्या पतीने काउन्सिलरसोबत आपलं नवं आयुष्य सुरू केलं आहे.

First published:

Tags: Drugs, Love story