मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - स्टाईलमध्ये दिला Helmet घालायला नकार; पुढच्याच क्षणी बाईकस्वार तरुणी...

VIDEO - स्टाईलमध्ये दिला Helmet घालायला नकार; पुढच्याच क्षणी बाईकस्वार तरुणी...

बाईक चालवताना हेल्मेट न घातलेल्या तरुणीला तिच्या नशीबानेच शिक्षा दिली.

बाईक चालवताना हेल्मेट न घातलेल्या तरुणीला तिच्या नशीबानेच शिक्षा दिली.

बाईक चालवताना हेल्मेट न घातलेल्या तरुणीला तिच्या नशीबानेच शिक्षा दिली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 25 जानेवारी : बाईक चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक आहे. गाडीचालकाच्या सुरक्षेसाठी हेल्मेट खूप गरजेचं आहे. अपघात झाल्यास जीव वाचतो. पण तरी काही बाईकस्वार हेल्मेट घालत नाहीत. पण असं करणं तुम्हाला किती महागात पडू शकतं, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बाईक चालवणाऱ्या एका तरुणीने हेल्मेट घालायला नकार दिला आणि त्याच्या पुढच्याच क्षणी तिच्यासोबत असं काही घडलं की तिला चांगलीच अद्दल घडली.

हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड आकारतात. हा दंड वाचवण्यासाठी तुम्ही कदाचित हेल्मेट घालाल. पण जीवाचं काय... वाहतूक पोलिसांच्या कारवाईला न घाबरणाऱ्या या तरुणालाही तिच्या नशीबानेच चांगली शिक्षा दिली. अशी शिक्षा की यापुढे हेल्मेट घातल्याशिवाय बाईकवर बसणारच नाही.

हे वाचा - हे तुमच्यासोबतही घडू शकतं! जीवन-मृत्यूमधील 'ती' 10 मिनिटं; थरकाप उडवणारा VIDEO

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुणी बाईक चालवते आहे. पण तिच्या डोक्यावर हेल्मेट नाही आहे. तिच्या मागून बाईकवरून येणारा तरुण तिला सावध करतो. तिच्या बाजूने जाताना तो तिला हेल्मेट घालण्याचा सल्ला देतो. मॅडम हेल्मेट घालता जा, पुढे नाक्यावर वाहतूक पोलीस पकडतील, असं तो तिला सांगतो. पण मुलगी फुल्ल कॉन्फिडन्समध्ये काही नाही होणार असं त्याला सांगते. तोसुद्धा मग गप्पच बसतो.

पुढच्याच क्षणी तरुणीसोबत नको तेच घडतं. जसा ती हेल्मेट घालायला नकार देते आणि पुढे जाते तशी ती पुढच्या बाईकला धडकते आणि बाईसह धाडकन कोसळते. सुदैवाने ती हायवेच्या कडेलाच पडते. तसं तिला फार काही लागत नाही. त्यानंतर ज्या बाईकला ती धडकली आणि ज्या बाईकस्वाराने तिला हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला होता, दोघंही आपले बाईक थांबतात.

हे वाचा - मुलाच्या स्टाईलने सगळेच थक्क, स्कूटीवर बसण्याचा हटके अंदाज होतोय व्हायरल, पाहा Video

त्या मुलीचा चेहराही पाहण्यासारखा आहे. खरंतर ती तोंडावरच पडली असं म्हणावं लागेल. त्यानंतर ज्या तरुणाने तिला हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला तो तिला फार लागलं नाही ना, असं विचारतो आणि आपल्या बाईकवर बसवून पुढे घेऊन जातो.

kashyap_memer  इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:

Tags: Accident, Bike accident, Viral, Viral videos