Home /News /viral /

कसं शक्य आहे? ड्रायव्हरशिवाय चालतेय गाडी, विश्वास बसत नसेल तर पाहा हा VIDEO

कसं शक्य आहे? ड्रायव्हरशिवाय चालतेय गाडी, विश्वास बसत नसेल तर पाहा हा VIDEO

ड्रायव्हरशिवाय कशी काय चालू शकते गाडी? उत्तर मिळत नसेल तर पाहा हा VIRAL VIDEO

    चेन्नई, 14 ऑक्टोबर : महागड्या गाड्यांपैकी एक असलेली टेस्ला (Tesla) कार ही ऑटोपायलटमुळे (Autopilot) प्रसिद्ध आहे. अशा तंत्रज्ञानाची कार अद्याप भारतात आली नाही. मात्र, ऑटोपायलट कारचा एक व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती ड्रायव्हर बाजूच्या सीटवर बसलेले दिसत आहेत, मात्र ड्रायव्हर नसताना ही गाडी चालत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक चकित झाले. हा व्हिडीओ तामिळनाडूचा आहे. प्रीमियर पद्मिनी (Premier Padmini) कारचा व्हिडीओ टॅगोर चेरी नावाच्या एका फेसबुक युजरने शेअर केला होता. व्हिडीओच्या सुरुवातीला प्रीमियर पद्मिनी रस्त्यावर आपोआप फिरताना दिसत आहे. तर, ड्रायव्हरच्या शेजारी एक वृद्ध व्यक्ती आहे. त्यांच्याकडे पहिलं तर असं वाटतंय की सीटवर ड्रायव्हर नसल्याचा त्यांना काही फरक पडत नाही. वाचा-डिफ्यूज करतानाच झाला 5 हजार किलो बॉम्बचा स्फोट, संपूर्ण शहर हादरलं; पाहा VIDEO हा व्हिडीओ पद्मिनीच्या मागे धावणाऱ्या दुसऱ्या कारमधून घेण्यात आला आहे. यात असे दिसते की ड्रायव्हरशिवाय ही कार महामार्गावर सहज धावत आहे आणि महामार्गावरील लेनसुद्धा बदलत आहे. वाचा-थरारक! चालत्या वॅगन आरनं घेतला पेट, आगीतूनच ड्रायव्हरनं मारली बाहेर उडी पण... टॅगोर चेरी यांनं फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करताना, 'आज काही लोकांनी एका व्यक्तीला पॅसेंजर सीटवर बसून पद्मिनी गाडी चालवताना पाहिले. लोकांना प्रश्न पडला आहे की हे कसं शक्य आहे? वाचा-हत्तीवर योग करता करता हत्तीच्या पायाजवळ कोसळले रामदेव बाबा आणि... VIDEO VIRAL कोण चालवत आहे गाडी? व्हिडीओ नीट पाहिल्यानंतर कळेल की, कारमध्ये बसलेली व्यक्तीच कार चालवत आहे. तो आपला उजवा हात उंचावून कारच्या स्टीयरिंगवर नियंत्रण ठेवत आहे. स्टीयरिंग व्हीलच्या आत गीअर्स आहेत. जेव्हा ही व्यक्ती टॉप गिअरनं हायवेवर पोहचला तेव्हा ड्रायव्हर सीटपासून पुढच्या सीटवर पाऊल ठेवले आणि एक्सलेरेशन पॅडलचा वापर केला. व्हिडीओ पाहणाऱ्यांना असे वाटते की गाडी आपोआप पुढे जात आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या