Home /News /viral /

अरे काय! भावाने रस्ता सोडून स्विमिंग पूलमध्ये पार्क केली कार, विचित्र अपघाताचा VIDEO VIRAL

अरे काय! भावाने रस्ता सोडून स्विमिंग पूलमध्ये पार्क केली कार, विचित्र अपघाताचा VIDEO VIRAL

रस्त्यावरून थेट स्विमिंग पूलमध्ये! असा मजेशीर अपघात तुम्ही कधीच पाहिला नसेल.

    फ्लोरिडा, 07 जानेवारी : वाहन चालवताना सावधान राहा, असे सतत सांगितले जाते. मात्र तरी वाहनचालक काही ना काही चूका करतात आणि परिणामी अपघातांना सामोरे जावे लागते. असाच एक प्रकर फ्लोरिडामध्ये घडला. पण कधी स्विमिंग पूलमध्ये अपघात झाल्याचे पाहिले आहे? सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये असा प्रकार घडला आहे. फ्लोरिडामधील पोलिसांनी स्विमिंग पूलमध्ये बुडलेल्या एका कारची छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यानंतर फ्लोरिडामधील या घटनेची बरीच चर्चा होत आहे. वेस्ट पाम बीच पोलिसांनी फेसबुकवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत ज्यात एका कार एका तलावामध्ये बुडलेल्या दिसत आहेत. सोशल मीडियावर या चित्रावर वेग वेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. वाचा-...आणि कॅप्टन कोहलीनं मैदानात केली भज्जी स्टाईल गोलंदाजी, VIDEO VIRAL वाचा-Google Map च्या नादात थेट कार पुलावरून पाईपलाईनवर कोसळली जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कार पूलमध्ये कशी पोहचली? तर, खरं तर असं घडलं की गाडी रिव्हर्स घेत असताना ही गाडी एका कुंपणाला धडकली. वाहनचालकाचा ताबा सुटला आणि हा अपघात झाला. यानंतर जवळ एका हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये कार पडली. दरम्यान, या कारमध्ये बसलेल्या लोकांचे नशीब चांगले होते आणि ते कारच्या मागील खिडकीतून त्यांनी उडी घेतली. हे फोटो शेअर करताना पोलिसांनी लिहिले की या अपघातात कोणाचेही नुकसान झाले नाही. वाचा-अशोक चव्हाणांनी 'लेकी'चा व्हिडिओ केला पोस्ट, पाहून तुम्हालाही वाटेल कौतुक पोलिसांनी गाडी पूलमधून बाहेर काढून व्हिडिओदेखील फेसबुकवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी विचित्र कमेंट केल्या आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: New viral video

    पुढील बातम्या