Home /News /viral /

VIDEO: अचानक कारने घेतला पेट; गाडी आपोआप लॉक झाली अन् आतमध्येच अडकला चालक, पुढे काय घडलं?

VIDEO: अचानक कारने घेतला पेट; गाडी आपोआप लॉक झाली अन् आतमध्येच अडकला चालक, पुढे काय घडलं?

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात टेस्ला मॉडेल वाय कारमध्ये आग लागल्याने एक माणूस आत अडकल्याचं पाहायला मिळतं

    नवी दिल्ली 28 मे : इलेक्ट्रिक गाड्या त्यांच्या इंधन मायलेज आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाने बाजारात येऊ लागल्या आहेत. लोकांना इलेक्ट्रिक वाहनं अधिक फायदेशीर वाटतात कारण ते शून्य विषारी वायू उत्सर्जित करतात आणि इतर इंधनावर चालणार्‍या वाहनांच्या तुलनेत चार्ज करण्यासाठी खूपच कमी खर्च येतो. मात्र इलेक्ट्रिक वाहने अजूनही नवीन तंत्रज्ञान आहेत, या वाहनांना आग लागल्याचे अनेक व्हिडिओ अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात टेस्ला मॉडेल वाय कारमध्ये आग लागल्याने एक माणूस आत अडकल्याचं पाहायला मिळतं (Fire Breaks out in Electric Car). मात्र, कारचा चालक नशीबवान आहे कारण त्याने काही वाईट घडण्याआधीच खिडकी तोडून कारमधून बाहेर उडी मारली आणि आपला जीव वाचवला. VIDEO : स्टंटसाठी तरुणाने मुंबईतल्या गगनचुंबी इमारतीवरून मारली उडी; धक्कादायक शेवट व्हिडिओमध्ये टेस्ला मॉडेल वाय कारमधून धूर निघताना दिसत आहे. कारच्या मालकाने धूर पाहून खिडकीतून उडी मारल्याने बाजूचे विंडशील्ड तुटलेले दिसले. काही वेळाने गाडीच्या आत आग लागलेली दिसते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे पाच मिनिटे लागले. टोरोंटो येथील ऑनलाइन ऑटोमोबाईल ड्रायव्हिंग मासिकाच्या अहवालानुसार, 2021 टेस्ला मॉडेल Y जमील जुथा नावाच्या व्यक्तीची होती आणि त्यांनी ही गाडी आठ महिन्यांपूर्वी विकत घेतली होती. ही भीषण घटना घडली तेव्हा जमील नॉर्थ व्हँकुव्हर, ब्रिटिश कोलंबिया येथील गोल्फ कोर्सला जात असल्याचं सांगितलं जात आहे. कारने आधी काहीतरी समस्या असल्याबद्दल इशारा दिला आणि नंतर गाडी बंद झाली. यामुळे दरवाजे आतून लॉक झाले. त्यानंतर वाहनाच्या एअर व्हेंटमधून धूर बाहेर येण्यास सुरुवात झाली. कारमधून बाहेर पडण्यासाठी जमीलकडे कारची खिडकी तोडण्याशिवाय पर्याय नव्हता. आग लागताच धावू लागले पेट्रोल पंपाजवळील लोक; धाडसी महिलेनं वाचवला सगळ्यांचा जीव, VIDEO इलेक्ट्रिक वाहन बाजारावरील कथांचे अहवाल देणारी वेबसाइट दावा करते की टेस्ला वाहनातील दरवाजे वापरताना इलेक्ट्रॉनिक रिलीझ हे प्राथमिक साधन मानले जाते. परंतु वीज बंद असताना ते चालत नाहीत. प्रत्येक दरवाजा मॅन्युअल रिलीझसह येतो. एका प्रत्यक्षदर्शीने हा व्हिडिओ शूट करून यूट्यूबवर पोस्ट केला आहे. तो सध्या व्हायरल झाले. व्हिडिओला 1.5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हा व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Fire, Shocking video viral

    पुढील बातम्या