मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Dream Job : झोपण्याचा पगार 25 लाख रुपये, कंपनी घरी गाद्याही पाठवणार!

Dream Job : झोपण्याचा पगार 25 लाख रुपये, कंपनी घरी गाद्याही पाठवणार!

कधी तुम्ही असं ऐकलं आहे का एखादी कंपनी काम न करता फक्त झोपण्याचे पैसे (Job to Sleep) देते? झोप (Dream Job) अतिशय प्रिय असेल, तर ही बातमी नक्की वाचा.

कधी तुम्ही असं ऐकलं आहे का एखादी कंपनी काम न करता फक्त झोपण्याचे पैसे (Job to Sleep) देते? झोप (Dream Job) अतिशय प्रिय असेल, तर ही बातमी नक्की वाचा.

कधी तुम्ही असं ऐकलं आहे का एखादी कंपनी काम न करता फक्त झोपण्याचे पैसे (Job to Sleep) देते? झोप (Dream Job) अतिशय प्रिय असेल, तर ही बातमी नक्की वाचा.

मुंबई, 19 ऑक्टोबर : कधी तुम्ही असं ऐकलं आहे का एखादी कंपनी काम न करता फक्त झोपण्याचे पैसे देते? झोप अतिशय प्रिय असेल, तर ही बातमी नक्की वाचा. ब्रिटनमध्ये (Britain) अशी एक कंपनी आहे, ज्या कंपनीकडून चक्क झोपण्याचे आणि आराम करण्याचे पैसे दिले जातात. या नोकरीमध्ये कामाचं स्वरूप म्हणजे फक्त घरात अंथरुणावर पडून झोपणं आणि टीव्ही पाहणं (Mattress Testing Job) एवढंच आहे. विशेष म्हणजे या कामासाठीही पगार मिळेल आणि थोडेथोडके नव्हेत, तर लाखो रुपये. या नोकरीची विशेष गोष्ट म्हणजे, तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. गादी पाठवून कंपनी तुमच्या घरीच तुमची झोपण्याची सोय करून देईल. 'द सन'च्या (The Sun) वृत्तानुसार, 'क्राफ्टेड बेड्स' (Crafted Beds) ही लक्झरी बेड कंपनी ही नोकरी देत आहे. ही नोकरी करणाऱ्या व्यक्तीला दररोज 6-7 तास अंथरुणावर घालवावे लागतील. क्राफ्टेड बेड्सद्वारे मॅट्रेस टेस्टरची नियुक्ती करण्यात येत आहे. ही नोकरी करणाऱ्याला कंपनीकडून 24,000 पौंड म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 25 लाख रुपये वार्षिक वेतन दिलं जाईल. हे काम करणाऱ्याला उच्च दर्जाच्या बेडवर झोपून त्याचा रिव्ह्यू द्यायचा आहे. म्हणजेच, कंपनीने बनवलेल्या गाद्या कशा आहेत, त्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे का, हे कंपनीला सांगावं लागेल. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला आठवड्यातून 37.5 तास गादीवर पडून राहावं लागेल. म्हणजे दिवसातून सुमारे 6 तास गादीवर पडून टीव्ही पाहावा लागेल किंवा झोपावं लागेल. यासाठी कंपनीने जाहिराती प्रसिद्ध करून इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. क्राफ्टेड बेड्सचे मार्केटिंग मॅनेजर ब्रायन डिलन यांनी म्हटलं आहे, की हे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची गरज नाही. गाद्या त्यांच्या घरी पोहोचवल्या जातील; पण अर्थातच ही नोकरी फक्त ब्रिटनमधले नागरिकच करू शकतात. संबंधित उमेदवाराकडे लेखनकौशल्यही असावं, जेणेकरून गादीची चाचणी केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल तो कंपनीला पाठवू शकेल. हा रिव्ह्यू दर आठवड्याला पाठवायचा असेल. एकूणच आराम हवा असणाऱ्या लोकांसाठी काहीही न करता पैसे मिळवण्याची ही आयती संधीच आहे. ही नोकरी ब्रिटनमध्ये असल्याने इकडच्या व्यक्तींना त्याचा काही उपयोग नाही हे खरंच; पण अशीही नोकरी असू शकते, या कल्पनेमुळेही अनेकांना वेगळाच आनंद मिळाला असेल.
First published:

पुढील बातम्या