Home /News /viral /

कसं शक्य आहे? माणसाने स्पर्श करताच 'मृत' झाला साप; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

कसं शक्य आहे? माणसाने स्पर्श करताच 'मृत' झाला साप; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

पहिल्यांदाचा एखादा साप माणसाला घाबरता दिसला आहे.

  मुंबई, 03 मे :  सापाच्या  (Snake video) दंशाने माणसाचा मृत्यू झाल्याचं तुम्हाला माहिती आहे. पण अशा विषारी साप माणसाच्या फक्त स्पर्शाने मृत झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? सध्या असाच एक शॉकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. चक्क एका माणसाला साप घाबरला आणि त्याच्या स्पर्शानेच त्याने आपला जीव सोडला. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही (Snake acting video) . साप माणसांवर हल्ला करतो हे तुम्हाला माहिती आहे. पण सापालाही कधी माणसांना घाबरताना पाहिलं आहे का? अशाच सापाचा हा व्हिडीओ आहे. जो माणसाला पाहून आधी घाबरला. त्यानंतर माणसाने स्पर्श करताच असं काही घडलं जे पाहून तुम्हाला विश्वासही बसणार नाही. व्हिडीओत पाहू शकता जमिनीवर एक साप सरपटताना दिसतो आहे. थोडं पुढे गेल्यावर त्याला एक माणूस दिसतो. माणसाला पाहताच तो घाबरतो. त्यानंतर स्वतःचं शरीर आखडून घेतो. इतक्यात ती व्यक्ती सापाला स्पर्श करते. तसा साप आपली जीभ बाहेर काढतो आणि उलटा होतो. हे वाचा - तरुणाने रस्त्याने चाललेल्या सापाला उचलून घेतलं; मग हाताला चावण्यासही पाडलं भाग, Shocking Video ती व्यक्ती सापाला हात लावून हलवते पण साप काही हलत नाही. म्हणजे तो मृत झाल्यासारखा वाटतो. आता साप फक्त माणसाने स्पर्श करताच कसा कार मरेल, याचं आपल्यालाही आश्चर्य वाटतं. असं प्रत्यक्षात शक्यच नाही.
  खरंतर हा साप नाटक करतो आहे. कारण जशी ही व्यक्ती मृत झाल्यासारख्या वाटणाऱ्या सापाला सरळ करते, तसा साप पुन्हा उलटा होतो. असं कितीतरी वेळा होतो. यावरूनच हा साप नाटक करत असल्याचं समजतं. हा ड्रामेबाज साप सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. हे वाचा - VIDEO: जबरदस्ती तरुणाच्या गळ्यात साप टाकून पैसे मागू लागला गारूडी; पुढे जे घडलं ते धक्कादायक व्हायरल हॉग इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सापाचं हे असं रूप लोकांना खूप आ़वडलं आहे. तर काही युझर्सनी सापाला हात लावणाऱ्या व्यक्तीबाबतही चिंता व्यक्त केली. जर साप त्याला चावला असता तर चांगलंच महागात पडलं असं त्यांनी म्हटलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Snake, Snake video, Viral, Viral videos

  पुढील बातम्या