मराठी बातम्या /बातम्या /Viral /

27 फूट महाकाय अजगरानं केला तरुणावर हल्ला, श्वास रोखून ठेवायला लावणारा VIDEO

27 फूट महाकाय अजगरानं केला तरुणावर हल्ला, श्वास रोखून ठेवायला लावणारा VIDEO

मासेमारी करण्यासाठी आलेल्या एका तरुणावर अजगरानं हल्ला केला आहे.

मासेमारी करण्यासाठी आलेल्या एका तरुणावर अजगरानं हल्ला केला आहे.

मासेमारी करण्यासाठी आलेल्या एका तरुणावर अजगरानं हल्ला केला आहे.

    मुंबई, 03 डिसेंबर : अनेक वेळा भरवस्तीत शिरून अजगरानं प्राण्यांची शिकार केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. इतकच नाही तर गाडीत, घरात अगदी चाकात नाही तर बोनेटमध्ये देखील अजगर शिरल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. अजगराला पाहूनच जिथे बोबडी वळते तिथे अजगरानं माणसावर हल्ला केला तर काय होईल याची केवळ कल्पनाच न केलेली बरी. एका 27 फूट लांब अजगरानं तरुणावर हल्ला केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. श्वास रोखून ठेवायला लावणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही तरुण मासेमारीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना काहीतरी मोठी हालचाल होत असल्याचं दिसलं. मासेमारी करणारे जेव्हा जवळ पोहोचले तेव्हा त्यांना घाम फुटला. विशाल अजगरनं ते जवळ येताच त्यांना शिकार बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पायाला वेटोळं घातलं. या अजगरापासून सुटका करण्यासाठी इतर मासेमारी करणारे तरुण पुढे सरसावले. त्यांच्यावर अजगरानं हल्ला केला. 6 जणांनी मिळून अजगरापासून तरुणाची सुटका करण्याचा प्रयत्न केला. साधारण या अजगराचं वजन 100 किलो असावं असा अंदाज आहे. मच्छीमारांनी याची माहिती तातडीनं वन अधिकाऱ्यांना देखील दिली. अधिकाऱ्यांनी हा 27 फूट लांबीचा अजगर पकडला आणि कित्येक मैलांवर जंगलात सोडला. अधिकाऱ्यांच्या मते, यापूर्वी देखील सर्वात लांब अजगर याच भागात पकडण्यात आला होता. त्याची लांबी 30 फूट होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इंडिनेशियातील जंगलातला असल्याचं सांगितलं जात आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या