लखनौ, 28 ऑक्टोबर : मतिमंद मुलांवर अत्याच्याराच्या घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. घरातील व्यक्तींकडून या मुलांचा छळ केला जातो आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात अवघ्या 13 दिवसाच्या मतिमंद बाळाला जन्मदात्यानींच पुरून टाकलं आणि आता उत्तर प्रदेशमधील धक्कादायक व्हिडीओ समोर येतो आहे. ज्यामध्ये एका मतिमंद तरुणाला दोरीनं बांधून त्याला खेचलं जातं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) झाला आहे.
ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या बहराइच जिल्ह्यातल्या बास गावातील. मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण मतिमंद आहे. तो घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याच्या काकाने त्याला दोरीनं बांधलं आणि अक्षरश: एखादी वस्तू खेचावी तसं त्याला खेचलं.
तरुणाच्या शरीरावरही काही मोजकेच कपडे आहे. अशा अवस्थेत त्याच्या काकाने त्याला दोरीनं बांधलं आणि घरापासून काही अंतरापर्यंत दगड-माती असलेल्या या जमिनीवरून खेचत नेलं. तरुणाला वेदनाही होत आहेत. जिवाच्या आकांताने तो ओरडत आहे. पण त्याच्या काकाच्या मनाला थोडाही पाझर फुटला नाही, त्याला त्याची दया आली नाही. मन हेलावणारा हा आहे.व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांपर्यंतही हा व्हिडीओ पोहोचला. त्यानंतर मतिमंद तरुणाच्या काकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचा - भररस्त्यात मारली गोळी, मग काढला मृतदेहाचा फोटो; थरकाप उडवणारा मर्डरचा LIVE VIDEO
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातल्या पुण्यातही मतिमंद बाळाची हत्याच केल्याची घटना घडली होती. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. वडगांव बुद्रुक येथील जाधवनगर परिसरातील दाम्पत्याला झालेलं मुल गायब असल्याचे समजल्याने परिसरातील नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती कळवली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंहगड कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या एका जंगलात 13 दिवसांच्या बाळाला पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जन्मलेले बाळ हे अपंग असल्याने आई वडिलांनी त्याला ठार मारून जंगलात पुरलं. आरोपी आई वडिलांना सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.