मराठी बातम्या /बातम्या /Viral /Video : तरुणीचा मोबाईल पाण्यात पडताच, डॉल्फिनचं असं वागणं... पाहून सर्वांनाच पडला प्रश्न

Video : तरुणीचा मोबाईल पाण्यात पडताच, डॉल्फिनचं असं वागणं... पाहून सर्वांनाच पडला प्रश्न

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

माणसाच्या आणि डॉल्फिनच्या मैत्रीचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण असं असलं तरी सध्या समोर आलेला व्हिडीओ हा वेगळा आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. इथे प्राण्यांपासून ते माणसांच्या एखाद्या क्षणापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.

हा व्हिडीओ डॉल्फिनचा आहे. आपल्याला हे माहितच आहे की डॉल्फिनहा खूप प्रेमळ जलचर आहे. माणसाच्या आणि डॉल्फिनच्या मैत्रीचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण असं असलं तरी सध्या समोर आलेला व्हिडीओ हा वेगळा आहे.

वानराने लावले माकडाच्या कानशिलात, पुढे जे घडलं ते... पाहा Video

हा व्हिडीओ amritesh_bhukhmaria नावाच्या अकाउंटवरुन इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोकांना भरभरुन प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

या व्हिडीओत नक्की आहे तरी काय?

डॉल्फिनला खायला देताना एक तरुणी घाबरली, ज्यामुळे तिचा फोन तिच्या हातातून सुटला आणि खोल पाण्यात पडला. या घटनेनंतर तर सगळ्यांनाच असं वाटलं की आता तिने मोबाईल गमावला, पण असं झालं नाही. तिला तिचा मोबाईल पुन्हा मिळाला आणि तो डॉल्फिनने आणून दिला.

व्हिडीओत पुढे, डॉल्फिन आपल्या तोंडातून काहीतरी घेऊन वर येताना दिसत आहे. तेव्हा तुम्ही पाहू शकता की त्याने या तरुणीचा मोबाईल शोधून आणला आहे, जे पाहून उपस्थीतांना विश्वास बसत नाहीय, इतकेच काय ही तरुणी देखील आपला मोबाईल पाहून खूपच आनंदी झाली.

या प्रकारानं हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे ही प्राणांना केलेल्या उपकाराची जाणीव असते. हे खरंतर खूपच रेअर दृश्य आहे. जे पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

First published:

Tags: Shocking, Social media, Top trending, Videos viral, Viral