मुंबई : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ डॉल्फिनचा व्हिडीओ आहे. लोकांना डॉल्फिन सहसा दिसत नाहीत आणि दिसले तरी देखील ते खोल पाण्यात दिसतात, यासाठी बोटीतून प्रवास करावा लागतो, ज्यासाठी काही लोक टूरिस्ट लोक पैसे देखील देतात.
या व्हिडीओमध्ये समुद्राच्या अगदी किनारी डॉल्फिन आला आहे. हा व्हिडीओ सिंधूदूर्गातील असल्याचं सांगण्यात येत आहे. हा डॉल्फिन घायाळ असल्यामुळे तो समुद्र किनारी आला होता. ज्याला तेथील स्थानिक मच्छीमारांनी जिवदान दिलं आहे आणि त्याला पुन्हा पाण्यात सोडलं.
Video : तरुणीचा मोबाईल पाण्यात पडताच, डॉल्फिनचं असं वागणं... पाहून सर्वांनाच पडला प्रश्न
हा मासा खरंतर डॉल्फिन सारखा दिसणारा फिनलेस पॉरपॉईज प्रजातीचा मासा आहे, जो मालवण तळाशील समुद्रकिनारी घायाळ अवस्थेत मच्छीमारांना दिसून आला. चार ते पाच फूट लांबीच्या या माशाला जोरदार लाटांपुढे टिकाव धरता येत नव्हता.
सिंधुदुर्ग : डॉल्फिन सदृश माशाला स्थानिक मच्छीमारांकडून जीवदान#sindhudurg #dolphin pic.twitter.com/bcIYt4TiNL
— News18Lokmat (@News18lokmat) March 20, 2023
स्थानिक मच्छीमारांनी प्रथम या माशाला खोल समुद्रात सोडले. मात्र काही काळ पाण्यात राहिल्यानंतर तो पुन्हा तो किनाऱ्यावर वाहून आला. लाटांचा जोर असल्यामुळे घायाळ माशाला टिकाव धरता येत नव्हता. अखेर मच्छीमारांनी तुलनेने संथ प्रवाह असलेल्या ठिकाणी खाडीत त्याला सोडले. डॉल्फिन प्रमाणे दिसणाऱ्या या सागरी जीवाला स्थानिक मच्छीमार बुलीया आणि हडसरी असे म्हणतात.
त्याच्या तोंडाकडील भागाच्या आकारावरून त्याला समुद्री डुक्कर असेही संबोधले जाते. मच्छीमारांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fish, Local18, Sea, Social media, Videos viral, Viral