मराठी बातम्या /बातम्या /Viral /नागपूरच्या संत्र्यांबरोबरच 'डॉली की टपरी' ची चर्चा; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल जबरा फॅन

नागपूरच्या संत्र्यांबरोबरच 'डॉली की टपरी' ची चर्चा; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल जबरा फॅन

आपलं वेगळेपण दाखवणारे लोक सोशल मीडियावर लगेचच लोकप्रिय होतात. डॉली चहावालापण त्यापैकीच एक.

आपलं वेगळेपण दाखवणारे लोक सोशल मीडियावर लगेचच लोकप्रिय होतात. डॉली चहावालापण त्यापैकीच एक.

आपलं वेगळेपण दाखवणारे लोक सोशल मीडियावर लगेचच लोकप्रिय होतात. डॉली चहावालापण त्यापैकीच एक.

नागपूर, 19 फेब्रुवारी : महाराष्ट्रातील नागपूर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण अजून एका गोष्टीसाठी नागपूरचं (Nagpur) नाव देशभरातल्या खाद्यरसिकांना माहीत आहे. 'डॉली की टपरी' (Dolly ki Tapri)  ही ती जागा.

चहाप्रेमींमध्ये (tea lovers) या जागेची कायम चर्चा असते. इथल्या चहाच्या दुकानाचा मालक डॉलीच्या (Dolly) हाताची चव (Taste) सोबतच त्याचा अनोखा स्वॅगसुद्धा (Swag) या लोकप्रियतेला कारणीभूत आहे. गेल्या काही वर्षात डॉली इंटरनेटवरचा मोठाच प्रसिद्ध चेहरा (Internet sensation) बनला आहे.

या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेला कारण बनली आहे, डॉलीची चहा बनवण्याची आणि सर्व्ह करण्याची भन्नाट आणि शैलीदार स्टाईल(Style). डॉली अगदी उंचावरून उकळणाऱ्या चहाच्या द्रावणात दूध ओततो. अगदी उंचावरून आणि वेगात हे करताना अगदी थेंबभरही दूध खाली सांडत नाही.

स्टायलिश आणि स्वॅगवाला असल्यानं साहजिकच तरुणांमध्ये डॉली जास्तच लोकप्रिय आहे. गेली 20 वर्ष डॉली चहाचं दुकान चालवतो आहे. केवळ चहा बनवण्यातच नाही तर ग्राहकांना सिगारेट पेटवून देण्यातही डॉली भन्नाट स्टाईल करतो. पैसे देता-घेतानाही त्याची स्टाईल पाहण्यासारखी असते.

हा स्टाईलबाज चहावाला त्याचं दुकान सकाळी  सहा वाजता उघडतो. रात्री थेट 9 वाजताच दुकान बंद होतं. केवळ 7 रुपयांमध्ये खास चहा मिळतो. पहिल्यांदा स्टॉलवर येणाऱ्यांना डॉली मोफत विलायचीही देतो.

एटिट्युड आणि स्टाईलबाबत विचारल्यावर तो सांगतो, 'मी अभिनेते रजनीकांत (Actor Rajinikanth) यांचा मोठा फॅन आहे. दाक्षिणात्य सिनेमे (South Indian Movies) मला खूप आवडतात. डॉलीचे लांब केस, उठून दिसणारे तीक्ष्ण नाकडोळे यामुळे काहीजण त्याला 'जॅक स्पॅरो ऑफ इंडिया' असंही म्हणतात.

हे वाचा लसूण सोलण्याची ही पद्धत पहिली का? सोशल मीडियावर तुफान VIRAL

ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सर्वच सोशल मीडियावर (Social media) डॉलीच्या चाहत्यांनी त्याचे व्हिडिओ पोस्ट केलेले दिसतात. लोक त्याच्या कलेमुळं चकीत होत त्याचं भरभरून कौतुक करतात.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Maharashtra, Mumbai, Nagpur, Video viral