मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कुत्र्याने गिळला एअरपॉड्स; पोटात चार्जिंग होती सुरू; एक्सरे पाहून डॉक्टरही हैराण!

कुत्र्याने गिळला एअरपॉड्स; पोटात चार्जिंग होती सुरू; एक्सरे पाहून डॉक्टरही हैराण!

आतापर्यंत अॅपलच्या अनेक प्रोडक्टविषयीच्या मजेशीर गोष्टी आपण ऐकला आहे. या बातमीनंतप अॅपलची विश्वासार्हता अधिकच वाढली आहे.

आतापर्यंत अॅपलच्या अनेक प्रोडक्टविषयीच्या मजेशीर गोष्टी आपण ऐकला आहे. या बातमीनंतप अॅपलची विश्वासार्हता अधिकच वाढली आहे.

आतापर्यंत अॅपलच्या अनेक प्रोडक्टविषयीच्या मजेशीर गोष्टी आपण ऐकला आहे. या बातमीनंतप अॅपलची विश्वासार्हता अधिकच वाढली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

आयफोन असो वा अॅप्पलचे दुसरे प्रोडक्टस नेहमीच आपल्या हायटेक क्वालिटी आणि फीचर्ससाठी ओळखले जातात. याचा पुरावा एक एयरपॉड यूजरला मिळाल्याचं समोर आलं आहे. या युजरचे अॅप्पलचे एयरपॉड्स एका कुत्र्याने गिळले. हैराण करणारी बाब म्हणजे कुत्र्याच्या पोटातही ही डिव्हाइस सुरू होती. जी ऑपरेशन केल्यानंतर काढण्यात आली.

अॅप्पलचं एखादं महागड डिव्हाइस हरवलं तर खूप टेन्शन येतं. अशातच जर कोणाचे एअरपॉड्स (Airpods) कुत्र्याने गिळले तर कोणालाही दोन गोष्टींचं टेन्शन असतंच. एक म्हणजे कुत्र्याच्या जीवाला काही धोका होऊ नये आणि दुसरं म्हणजे महागडं डिव्हाइस कदाचित खराबही होऊ शकतं. अशात इंग्लंडमधील एका महिलेच्या पाळीव कुत्र्याने जेव्हा तिचा एअरपॉड गिळला त्यानंतर तिच्या हृदयाचे ठोके चुकले.

हे ही वाचा-नियंत्रण सुटलेल्या गाडीसमोर अचानक आला 4 वर्षांचा मुलगा आणि...Shocking Video

पोटातदेखील एअरपॉड्स चॉर्ज होत होते

इंग्लंडमध्ये राहणाऱ्या Rachel Hick च्या गोल्डन रिट्रीवर डॉग जिम्मीने एयरपॉड्स गिळले. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात हलविण्यात आलं. येथे कळालं की त्याच्या पोटात एअरपॉड्स सुरू आहेत. Rachelने सांगितलं की, जिम्मी तिच्यासोबत खेळत होता. त्याने उडी मारली एवढ्यात Rachel च्या खिशातून बाहेर पडलेले एअरपॉड्स जिम्मीने गिळून घेतले. त्याने चार्जिकसकट एअरपॉड्स गिळले. एनबीटीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Rachel तातडीने कुत्र्याला घेऊन रुग्णालयात गेली. डॉक्टरने त्याचा चेकअप केला. बॅटरीतून निघणारं लिक्विड जिम्मीच्या पोटात जाऊन त्याला त्रास होऊ नये याची भीती होतीच. यात जिम्मीच्या जीवाला धोका होता. त्यानंतर तातडीने त्याचं ऑपरेशन करण्यात आलं. एअरपॉर्ड जिम्मीच्या पोटात असतानाही चार्ज होत असल्याचं पाहून डॉक्टरही हैराण झाले. इतकचं नव्हे तर त्याच्यावर एकही स्क्रॅच नव्हती. सध्या जिम्मीची प्रकृती ठीक आहे.

First published:

Tags: England, Photo viral