मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Video: हाच खरा हीरो! कुत्र्यानं वाचवला पिलाचा जीव, व्हिडिओ झाला व्हायरल

Video: हाच खरा हीरो! कुत्र्यानं वाचवला पिलाचा जीव, व्हिडिओ झाला व्हायरल

एका तलावात बुडणाऱ्या पिल्लासाठी एका कुत्र्यानं आपला जीव धोक्यात घातला होता. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका तलावात बुडणाऱ्या पिल्लासाठी एका कुत्र्यानं आपला जीव धोक्यात घातला होता. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका तलावात बुडणाऱ्या पिल्लासाठी एका कुत्र्यानं आपला जीव धोक्यात घातला होता. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई, 19ऑगस्ट : पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या प्राण्यांना माणसांनी वाचवल्याचे कित्येक व्हिडिओ आपण पाहिले असतील. मात्र, आता एका कुत्र्याने दुसऱ्या एका पिल्लाला वाचवल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. थायलंडमधील लोपबुरी या शहरातील हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमधील कुत्र्याला नेटीझन्स खरा हीरो म्हणत आहेत. एका तलावात बुडणाऱ्या पिल्लासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला होता. या धाडसी कुत्र्याचं नाव ‘हँड’  असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याने ‘सोह’ नावाच्या पिल्लाचा जीव वाचवला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला, आणि एका इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. “थायलंडमधील एका धाडसी कुत्र्याने समोरच्या घरातील यार्डमध्ये असलेल्या तलावात अडकलेल्या दुसऱ्या लहान कुत्र्याला वाचवले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला. पाच ऑगस्टला ही घटना घडली.” अशा आशयाचे कॅप्शन देत हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हेही वाचा - ना हेल्मेट, ना नियम; साहसवीर गोविंदांनी मुंबईत घातला गोंधळ; पाहा Video नेमकं काय घडलं व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता, की हान हा पांढऱ्या रंगाचा कुत्रा आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना, अचानक तिथल्या तलावात पडतो. यावेळी पोहता येत नसल्यामुळे हान तलावाच्या किनाऱ्यावर आपले समोरचे पाय ठेऊन बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो. अचानक त्याचे दोन्ही पाय घसरून तो पूर्णच पाण्यात जातो, आणि गटांगळ्या खाऊ लागतो. हे बघून समोरच्या घरात खेळणारा हँड हा भुऱ्या रंगाचा कुत्रा धावत या तलावापाशी येतो, आणि आजूबाजूला कोणी मदतीसाठी आहे का ते शोधतो. मात्र, मदतीसाठी जवळपास कोणीही नसल्याचे पाहून शेवटी हँड स्वतःच हानला आपल्या तोंडात पकडून बाहेर  खेचतो.
View this post on Instagram

A post shared by NowThis (@nowthisnews)

खरं तर बुडणाऱ्या एका कुत्र्याला अशा प्रकारे बाहेर काढणं हे कोणासाठी देखील अवघड काम आहे. मात्र हँडने वेळ वाया न घालवता तातडीने केलेल्या या कामाचे कौतुक नेटकरी करत आहेत. जगभरातील हजारो श्वानप्रेमींनी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “सुरुवातीला माझ्या काळजात धस्स झालं, मात्र या कुत्र्याचा मित्र तेथे असल्यामुळे तो वाचला. अशी असावी मैत्री.” अशा आशयाच्या कमेंट्स या व्हिडिओवर  येत आहेत. केवळ दुसऱ्या श्वानांसाठीच नाही, तर आपल्यासाठीही कुत्रा हा अगदी चांगला मित्र असतो. “आपला मूड ठीक करण्यासाठी, दिव्यांगांच्या मदतीसाठी, जीव वाचवण्यासाठी आणि जीव लावण्यासाठी अशा सर्व गोष्टींसाठी श्वान आपल्या सोबत असतो.” असं मत एका नेटिझनने व्यक्त केलं. आणखी एका नेटीझनने म्हटलं, “यामुळेच या जगात कुत्र्यांचं असणं गरजेचं आहे. काही लोक कुत्र्यांशी अगदी चुकीचा व्यवहार करतात, मात्र कुत्रे हे प्रेमळच असतात. विशेषतः त्या व्यक्तींसाठी ज्या त्यांना खायला देतील.” पाच ऑगस्टचा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.
First published:

Tags: Video viral

पुढील बातम्या