Home /News /viral /

OMG! श्वानाचा हा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल; पाहूनच हादरले नेटिझन्स

OMG! श्वानाचा हा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल; पाहूनच हादरले नेटिझन्स

Dog running on water : नदीच्या पाण्यात गेलेल्या या श्वानाला पाहून याला चमत्कार म्हणावं की आणखी काही तेच समजेना.

  मुंबई, 18 मे : श्वानांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही फनी असतात तर काही इमोशनल. पण आता एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. हा श्वान असं काही करताना दिसले ते पाहून नेटिझन्स हादरले आहेत. याआधी कदाचित तुम्ही श्वानाला असं कधीच पाहिलं नसावं (Dog running on water). श्वानाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा श्वान एक नदी पार करताना दिसला. तसं श्वानांना पोहायला येतं. पण हा श्वान नदीत जाताच पोहोताना दिसला नाही. उलट तो नदीवर उड्या मारत सुसाट धावत सुटला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक मोठी नदी दिसते आहे. श्वान या नदीत जातो. पण तो पोहोण्याऐवजी नदीच्या पाण्यात धावताना दिसतो. सुरुवातीला पाणी थोडं असेल म्हणून असं असावं असं वाटतं पण नाही श्वान नदीत पुढे पुढे धावत जातो. तरी तो पाण्याच्या आत जात नाही. एरवी सामान्यपणे श्वान जर पाण्यात असता तर त्याचं अर्ध शरीर पाण्याच्या खाली असतं. पण हा श्वान पूर्णपणे पाण्याच्या वर आहे. जसं जमिनीवर धावावं तसं तो पाण्यात धावताना दिसतो आहे. अगदी त्याचे पंजेही पाण्याच्या आत जात नाही. हे वाचा - चक्क एका सिंहिणीने सिंहाच्या तावडीतून केली माणसाची सुटका; कधीच पाहिला नसेल असा VIDEO हा व्हिडीओ कोणत्या फिल्ममधील कोणत्या हॉरर सीनपेक्षा किंवा चमत्कारिक व्हिडीओपेक्षा कमी नाही. व्हिडीओ पाहून बहुतेकांना धक्का बसाल आहे.
  व्हिडीओ पाहिल्यानंतर असं कसं शक्य आहे, असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. तर काही जणांनी हे कसं शक्य आहे, याचं उत्तरही देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने आपाआपले वेगवेगळे तर्कवितर्क लढवले आहेत. कुणी हा व्हिडीओ एडिटेड असल्याचं म्हटलं आहे. तर कुणी यामागील नेमकं कारण स्पष्टीकरण देत सांगितलं आहे.  तर कुणी पाणी कमी असल्याचं म्हटलं आहे. हे वाचा - हौशेपोटी महिलेने स्वतःच्या जिभेचे केले दोन तुकडे आणि आता...; Shocking Video तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नेमकं काय वाटतं. कुत्रा असा पाण्यावर न बुडता धावण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं, हे तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Dog, Pet animal, Viral, Viral videos

  पुढील बातम्या