मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तुम्हीही कुत्रे-मांजरांसोबत झोपत असाल तर सावधान! महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार

तुम्हीही कुत्रे-मांजरांसोबत झोपत असाल तर सावधान! महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार

श्वानाने महिलेसोबत केलं धक्कादायक काम.

श्वानाने महिलेसोबत केलं धक्कादायक काम.

पाळीव श्वानाने महिलेसोबत जे केलं ज्याचा कुणीच विचारही केला नसेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

लंडन, 27 सप्टेंबर : बरेच लोक आपल्या पाळीव प्राण्यांना आपल्यासोबत घेऊन झोपतात. पण ही सवय तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते. एका महिलेला याचा चांगलाच प्रत्यय आला आहे. तीसुद्धा आपल्या लाडक्या डॉगीला आपल्यासोबत घेऊन झोपली. पण त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली. श्वानाने तिच्यासोबत असं काही केलं, ज्याचा तिनेच काय इतर कुणीच स्वप्नातही विचार केला नसेल.

यूकेच्या ब्रिसलमध्ये राहणारी 51 वर्षांची अमँडा गोमा. जिच्या घरी चुवावा ब्रीड जातीचा एक कुत्रा आहे. तिच्या या पाळीव श्वानाचा नाव बेले आहे. हा कुत्रा आकाराने खूप लहान असतो. अमँडा या कुत्र्याला आपल्यासोबत घेऊन झोपत होती. एकेरात्री ती अशीच त्याच्यासोबत झोपली. पण त्याने तिच्यासोबत असं काही केलं, की तिला रुग्णालयात धाव घ्यावी लागली.

हे वाचा - Pitbull Dog Attack On Cow : पिटबुल डॉगने आता गायीलाही बनवली शिकार; श्वानाच्या भयंकर हल्ल्याचा VIDEO

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार झोपेत अमँडाचं तोंड उघडं राहायचं. त्या दिवशी तिला तोंडात काहीतरी असल्याचं जाणवलं. त्यामुळे ती झोपेतून पटकन जागी झाली. तेव्हा तिला जे दिसलं ते पाहून धक्काच बसला. कारण तिच्या श्वानाने तिच्या तोंडावर पॉटी केली होती.

ती तात्काळ बाथरूमकडे तोंड धुवायला गेली पण तिचा मुलगा अंघोळ करत होता. त्यामुळे तोंड धुवायला तिला उशिर झाला. तोपर्यंत तोंडातील घाण तिच्या पोटात गेली होती. खूप वेळा तोंड धुतलं, ब्रश केलं पण तोंडातील दुर्गंधी आणि घाणेरडी चव काही जात नव्हती. त्यानंतर तिच्या मुलीने श्वानाला डॉक्टरकडे नेलं, तेव्हा त्याला बॅक्टेरिअल इन्फेक्शन झाल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी त्याला अँटिबायोटिक्स दिल्या.

हे वाचा - क्रूरतेचा कळस! माणसाचं श्वानासोबत संतापजनक कृत्य; Shocking Video

त्यानंतर अमँडामध्येही तिच्या श्वानासारखीच काही लक्षणं दिसू लागली. तिचं पोट खराब झालं आणि तिला वारंवार शौचाला होत होती. तीसुद्धा डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिला काही औधं दिली. पण तिची तब्येत अधिकच बिघडत गेली. तिला अॅम्ब्लुलन्सने रुग्णालयात आणण्यात आलं. तिला ३ दिवस रुग्णालयात दाखल केलं. श्वानाच्या शौचामुळे तिलाही गॅस्ट्रो इन्टस्टाइनल इन्फेक्शन झालं होतं.

First published:

Tags: Dog, Pet animal, Viral