मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! चक्क श्वानाने बनवले Cookies; विश्वास बसत नाही तर पाहा हा Chef Dog चा Video

OMG! चक्क श्वानाने बनवले Cookies; विश्वास बसत नाही तर पाहा हा Chef Dog चा Video

घरात मालकाची सर्व कामात मदत करणाऱ्या श्वानाने आपलं कुकिंग स्कीलही दाखवून दिलं आहे.

घरात मालकाची सर्व कामात मदत करणाऱ्या श्वानाने आपलं कुकिंग स्कीलही दाखवून दिलं आहे.

घरात मालकाची सर्व कामात मदत करणाऱ्या श्वानाने आपलं कुकिंग स्कीलही दाखवून दिलं आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 06 जून : श्वानाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात (Dog viral video). काही व्हिडीओत श्वान आपल्या मालकाची किती मदत करतात हेसुद्धा दिसतं. अगदी घरकामातही श्वान मदत करताना दिसतात. मग बाजारात जाऊन सामान आणणं असो किंवा घरातील इतर कामं असो. श्वान आपल्या मालकाला शक्य त्या कामात मदत करतात. आता तर श्वान किचनमध्येही मालकाची मदत करण्यात मागे नाही, हेच दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरस होतो आहे  (Dog Making Cookies) . एका श्वानाने चक्क कुकीज बनवले आहेत (Dog Prepares Cookies). श्वानांना कुकीज आवडतात हे तुम्हाला माहितीच असेल. आपले फेव्हरेट कुकीज या श्वानाने स्वतःच तयार केले आहे. जशी माणसं किचनमध्ये जाऊन आपल्यासाठी काही ना काही बनवताना दिसतं. अगदी तसाच हा पाळीव कुत्रा आपल्या मालकासोबत किचनमध्ये गेला आणि त्याने स्वतःसाठी कुकीज बनवल्या. हे वाचा - OMG! रस्त्यावर मृतावस्थेत पडलेला श्वान फक्त हात लावताच जिवंत झाला; व्यक्तीने कसा केला चमत्कार पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता एखाद्या प्रोफेशनल शेफसारखं त्याने अॅप्रन आणि कॅपही खातली आहे. शेफचा ड्रेस घालून तो कुकीजसाठी पीठ तयार करण्यापासून ते कुकीज बेकींग करण्यापर्यंत सर्वकाही करताना दिसतो. अर्थात हे त्याला एकट्याला शक्य नाही. त्याच्या मालकिणीनेही त्याची मदत जरूर केली असावी.  शेवटी तो आपल्या हातांनी तयार केलेल्या कुकीजचा आस्वादही घेताना दिसतो आहे.
cleoandelimaedalmatians इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा शेफ डॉग कसा वाटला हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा. हे वाचा - माकडाने घेतला झोपलेल्या कुत्र्याशी पंगा; क्षणातच मिळालं कर्माचं फळ, मजेशीर Video
याआधी एका मांजरीनेही आपलं असं कुकिंग स्कील दाखवलं होतं. ऑनलाईन रेसिपी व्हिडीओ पाहून तिने ऑमलेट तयार केलं होतं. पफ इन्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता, मांजर एक ऑनलाइन रेसिपी व्हिडीओ पाहताना दिसते आहे. त्यामध्ये ती ऑमलेटची रेसिपी पाहते आहे. ही रेसिपी तिला खूपच आवडते. त्यामुळे ती स्वतः बनवण्याचा प्रयत्न करते. जसं व्हिडीओत दाखवलं आहे तसं ती करते आणि फायनली तिची रेसिपी तयार होते. मांजराने बनवलेलं ऑमलेट तिनं व्हिडीओत पाहिल्याप्रमाणे हुबेहुब होत नाही. त्यामुळे ती थोडी नाराजच दिसते आहे.  पण असो तिने केलेला प्रयत्न मात्र फसलेला नाही. किमान खाता येईल असं ऑमलेट तरी तिनं बनवलं आहे. त्यामुळे तिच्या या कुकिंग टॅलेंटचं कौतुक करायला हरकत नाही.
First published:

Tags: Viral, Viral videos

पुढील बातम्या