हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे स्पष्ट झालं नसलं तरी व्हिडिओमध्ये एक बोट पाण्यातून चाललेली दिसते. त्यावर लष्कराचा एक जवानही दिसत आहे. अचानक एक कुत्रा बोटीतून पाण्यात उडी मारतो आणि काही अंतर पोहतो. तेव्हा पाण्यात अडकलेली एक खारूताई दिसते. कुत्रा तिच्याजवळ पोहोचताच तिला आपल्या चेहऱ्यावरच बसवतो आणि नावेपर्यंत आणतो. श्वानाच्या धाडसाचं चांगलंच कौतुक होत आहे, कारण व्हिडिओमध्ये दिसतं की श्वानाच्या मानाने हे पाणी खोल आहे. बाळाला कडेवर घेतलेलं असतानाच घसरला पाय अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सुशांत नंदा यांनी लिहिलं, कुत्रा पाण्यात उडी घेतो आणि बुडणाऱ्या खारीला वाचवतो. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. काहींनी लिहिलं की हे दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. श्वानांच्या धाडसाचा प्रत्यय देणारा हा पहिलाच व्हिडिओ नाही, तर याआधीही अनेकदा असे व्हिडिओ समोर आले आहेत.Dog jumps & saves the life a squirrel that was getting drowned. All lives matter 🙏
🎥Yoda4ever pic.twitter.com/HIaJdwfuJT — Susanta Nanda IFS (@susantananda3) March 6, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.